Monday, February 8, 2010

आता मी स्वार्थी होणार.....


विस्कटलेला डाव, कोसळलेलं घरटं....
फुटलेलं काळीज अन बिथरलेलं मनं
एकच गुलाब
पण तेही काटेरीच
लाख जपायचा प्रयत्न केलाय
आजवर त्याला
पण शेवटी तेही कोमेजलेच.....
आजवर कोणाकडुनच काहीही मागीतले नाही ....
काहीच नाही
भावशुन्य विश्वात जगत होतो
सगळ्यांना सांभाळत....जपत
स्वतःच्या सावलीलाही घाबरत
स्वतःला दिवसांगणीक मारतच होतो....
मी...... माझे........ माझ्यासाठी.....
ह्या गोष्ठींना काही थारच नव्हता
माझ्या आयुष्यात
जे काही होते ते फक्त तुझेच होते...
तुझ्याचसाठी होते
आपल्या स्वप्नांना मी त्यादिवशीच आग लावलीय
आता त्या सप्तरंगी स्वप्नांची राख
चेह-याव्र फासुन
आता जगायचा विचार चाल्लाय.....
कोणी निंदो कोणी वंदो.....
आता कोणासाठीच जगायचे नाही
कोणाचसाठी नाही.....
आता बस्...
मी आणी मी
किंवा कदाचीत
मी विरुध्द मी बस्...
ठरवलेय मी
की आता मी स्वार्थी होणार.....
नेहमीच तुमचाच
ओंकार

No comments:

Post a Comment