Saturday, September 15, 2012

थोडसं जगुन.....
ह्या गर्दीत आपण...
अगदी असेच हरवायचो...
हक्काचं निळशार आभाळ..
एकमेकांच्या डोळ्यांत शोधायचो..
ह्या गर्दीत आपण
अगदी असेच हरवायचो

हसायचो रुसायचो...
क्वचित कधीतरी भांडायचो...
भांडुन भांडुन दमलो की..
स्वतःवरच रागवायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..

घ्यायचो आणाभाका सोबतीच्या
भविष्याची सप्तरंगी स्वप्ने रंगवायचो
तु व्हायचीस नकळतच गुंग
मी तुझी थट्टा उडवुन जायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..

भर पावसाच्या साक्षीने..भिजताना...
अगदी एकरुप होऊन जायचो...
त्या मावळतीच्या सुर्याला पाहायला...
त्या आडवळणाच्या नदीपाशी जायचो...
त्या गर्दीतही आपण...
काही क्षण वेगळे वाटायचो...

तोच तो किनारा...
अन तिची ती अल्लड नक्षी...
तिच्या सादेला प्रतिसाद देणारा..
तोच कुठलातरी चुकार पक्षी...
तोच मी...अन तीच तु...
सारं काही तेच जुनं...
अगदी नव्यानेच रोज अनुभवायचो...

ह्या एकांतात क्षणभर का होईना...
आपण थोडसं जगुन घ्यायचो...
बस.....थोडसं जगुन घ्यायचो...


ओंकार

No comments:

Post a Comment