Thursday, February 15, 2007

अगं ए दिवाने



अगं ए दिवाने
तुझा दिवाना बनवलस गं मला

प्रेम काय असतं हे
आज शिकवलस ग मला

आत्तापर्यंत करत होतो मी
फक्त स्वतःचा विचार

तुझ्या आठवणींनी आज मात्र
मी होत आहे बेजार

आत्त पर्यंत होतो मी
एका चौकटीत गुंतलेलो

बाहेरच्या जगातील
सारी सुखेः मी हुकलेलो

तु मात्र आता मला
असे काही सावरलसं

जिवनाचे सारे सार मला
तु समजावलसं

तु जेंव्हा त्या लाजरया नजरेने
अधुनमधुन माझ्याकडे पाहातेस

जणु काहीतरी त्यातुन
जादु काही करतेस

तुझा आणी फक्त तुझाच
विचार आज् मी करतोय

तुझी आठवण काढत
मीही कविता लिहीतोय

काय करायचे हे कळतच नाही
काय काय बोलायचं हे सुचतच नाही

आज सांगायचे तुला हे रोज सकाळी ठरवतो
तु समोर आल्यावर मात्र सारे काही विसरतो

त्यावेळी नजरेत तुला भरभरून साठवतो
तुझी आठवण आल्यावर तुझा चेहरा आठवतो

Friday, February 9, 2007

नवे पंख





नवे पंख नवा ॠतु
नव्या ॠतुंचा बहर नवा
नव्या स्वप्नांनी उडण्यासाठी
नव्या स्वप्नांचा आभाळ हवा
नवी स्वप्ने वाट नवी
सर्व काही हवे नवे नवे
मिळो तुला जे तुला हवे हवे

Wednesday, February 7, 2007

असाही अंधार


जिथे आयुष्याचा अर्थ संपला,
त्या जिवनाच्या वळणावर उभा आहे बघ मी,


त्या काळोखाच्या आडोश्याला जरा शोध मला
बघ नक्की मिळेन मी,


असेन असाच शांत
अंधारलेल्या रात्रीसारखा,

दिवस उजाडण्याची वाट पाहत,
असेन असाच कासविस तुझ्या आठवणींनी
जसा होतो आज भेटल्यावर,


बघ फक्त एकदा
मागे माझा आवाज आला तर,

बघ असेनही कदाचित मागे उभा,
जन्मोजन्मी तुझीच वाट पाहत,


अरे तुला काय वाटते
जाईन का मी असा सोडून,

अनाहुत पणे अंधारामद्ये????


नाही ग वेडे,

अपयशाला घाबरणारयांपैकी मी नाही,

आयुष्यात आली जरी माझ्या संकटे काही,

नाही दाखवणार पाठ सखे,


आहे मनाच्या पंखात बळ मैत्रीचे,


आकाशामद्ये चमकणारया चंद्राप्रमाणे नसेनही कदाचित,
पण काळोख्या रात्रीत चमकणारया काजव्याप्रमाणे नक्कीच आहे ना गं मी?

अग अंधारलेल्या ह्या जगात राहीनही मी असाच शांत,

पण चालेल का तुला ते?


लागतील काही जन्म उलटतील काही जन्म,
जाईनही कदाचित मी दुर ह्या जगातून,


पण माझे हे गित देत राहील तुला साथ काळोखामद्ये,
अग वेडे तेंव्हा कधी जर माझी आठवण आली,

तर काळ्याकभिन्न अश्या आकाशातील
तारयांमध्ये पहा



सगळीकडे तुला मीच दिसेन


!
मीच दिसेन!! मीच दिसेन!!!

Friday, February 2, 2007

मि आणी अंधार.


मि आणी अंधार.

त्या दिवशी घरातुना निघालो
पाहायला अंधार

विचारून घेणार होतो गोष्ठी
सुःख दुखाःच्या दोनचार,
फिरफिर फिरलो पण
नाही मिळाला अंधार.

नाराज होउन शेवटी मि एका घरापाशी आलो,
कंटाळलो होतो म्हणुन तिथे दोन क्षण थांबलो.

तेवढयात नजाणो कुठून तो बाहेर आला,
पाठी मागे येऊन माझ्या दोन् क्षण थांबला.

मी म्हणालो अरे मित्रा माझी कसली भिती?
रात्रीच्या राज्याचा राजा तु घाबरतोस् किती?

तो म्हणाला मला घाबरवेल अशी जगात एकही गोष्ठ नाही
तु जाशील घाबरून म्हणून मी बाहेर आलो नाही

मी विचारले त्याला रात्री पडतोस बाहेर मग
दिवसा असतोस कुठे ?

तो म्हणाला रात्री बाहेर असतो
म्हणुन दिवसा असतो एथेच

अरे मला तुम्ही घाबरतात
तुम्ही मला काळा म्हणता

हो आहे मी काळा
अरे पण मी रंगाने काळा आहे ह्यात माझा काय दोष

अरे मी काळा आहे म्हणूनच तर माझा भाऊ प्रकाश गोरा आहे तुम्हाला रात्रीला झोप आहे
आणी मी आहे म्हणुन
तर तुम्ही आहात
मि असतो असतो तुमच्याच मद्ये
काळ्या कभिन्न ढगांच्या आड
अंधारलेल्या घरांच्या भिंती आड
त्या गावबहेरच्या डोंगराच्या आड
तुझ्यात त्याच्यात
सर्व आसमंतात्
प्रत्येक् दिशांत आणी

जसा आला नकळतच तसा निघुनही गेला अनाहूतपणे...............

ओंकार

Thursday, February 1, 2007

अंधःकार


अंधःकारअंधारच्या साम्राज्याला जिथे आहे वाव
त्या अश्या मनाच्या कोनाड्यात वसला आहे माझा गाव
जिथे माणुस माणसाला विचारत नाही
कुणी कुणाच काही लागत नाही
अश्या ह्या अंधारलेल्या दाट ढगांच्या आड वसला आहे माझा गाव
जिथल्या प्रत्येक गोष्ठीवर आहे फक्त अंधारचेच नाव
जिथे दिवस उगवायचे घेत नाही नाव्
अश्या अंधःकारमय क्षितीजामागे वसला आहे माझा गाव
अंधःकारात ह्या अश्या आज मिटून जाईल माझे नाव
उद्याचा त्या अंधःकारमय रात्रीत कोणास ठाऊक माझा ठाव
जिथे नाती नाहीत प्रेम नाही नाही कोणता भाव
त्या अनाहुतपणे पडणारया अंधारामध्ये हरवुन जाईल माझा गाव