Thursday, March 15, 2007

उनाड कविता





वर सुर्य आहे तापला
खाली धरती तापली,
सारे उदास उदास
एक माय ती रडली.

घोटभर पाण्यासाठी
ती गावभर हिंडली,
श्रीमंताच्या दारापाशी
दोन क्षण ति थांबली.

आठवण बाळाची
तिच्या मनात दाटली,
ज्याला पाणी पाजण्यासाठी
ति गावभर हिंडली.

त्यांच्या घरात
सदाच शिमगा,
गरीबांच्या घरी मात्र
आहे फक्त वणवा.

तयांचा घरात
भरलेले माठ
तयांच्या विहीरी
भरल्या काठोकाठ,

बाळे तयांची
खेळती पाण्यासंगी
माझा तान्हुल्याची
लाही होत असेल् अंगी.

नाही मोल तयांना
त्या घोटभर पाण्याचे
तिच्या कानात गुंजले
रडणे पोटच्या गोळ्याचे,

तयांच्या शेतात पाटातुन
वाहे पाणी
तिच्या बाळाच्या
डोळ्यांत नाही पाणी.

सारया विहीरी आटल्या
नदी नालेही आटले
पावसाची वाट पाहत
डोळे आभाळी लागले,

आभाळात नाही पाणी,
धरणीत नाही पाणी,
नाही कुठेही बाकी पाणी
मग डोळ्यांतुन का वाहे पाणी

धिर करुन ति आई
त्या आईला बोलली,
तुमच्या सारखाच
माझाही कान्हा निजला आहे घरी.

थोडेसे तरी पाणी
मला मिळेल कागे माये,
पाण्यासाठी माझा राजा
माझी घरी वाट पाहे.

थोडेसे पाणी घेऊन
ति खुशीत चालली,
उचलुन घेण्यासाठी बाळा
ति माय आज धावली.

घरी जाऊन तिने
बाळास पुसले
बाळराज माझे आज गप्प का बैसले,
काय सांगेल तो तिला निरागस तो बाळ
आईच्या मायेने आज भारावुन गेला होत एक काळ.

Tuesday, March 13, 2007

मुखवटा



कुठुन आलो आपण
आयुष्य आपले भरजरी,
नको त्याच्या पाशात अडकलो
केली जिवनाची नासाडी.

किती चांगले मुखवटे
किती दिले शिव्याशाप,
वाटले होते गंगेमध्ये धुवुन जातील
आपली पापं.आपली
पापं संपली नाहीत
गंगेमध्ये धुतली नाहीत
मनामध्ये काळोख असल्याने
मने मात्र जुळली नाहीत.

दुसरयाची कधी नाही केली पर्वा
जेव्हा होता जवानीचा जोश
,आयुष्याची लाट हरवुन गेली
तेंव्हाच कशाला द्यायचा नशीबाला दोष.

चित्रगुप्ताप्रमाणे बनवत राहीलो
जमाखर्चाच्या वह्या
समजुन कोणालाही घेतले नाही
आता लागले पस्तावया

आपला शोध चालुच राहीला
कधी भावार्थ कुणा न सापडला
भेटला आणी पुन्हा हरवला
मुखवट्या आडचा मुखवटा
चेहरया आडचा चेहरा
लुप्त होतच राहीलाहोतच राहीला........

Monday, March 12, 2007

शांततेचा अंत शोधताना




ती शांतता वादळापुर्वीची,
भेटण्यापुर्वीच्या विरहाची ,
मनात दाटण्यारया भावनांची,
कधी कधी हसवणारया आठवणींची....

जशी नेहमीच असते किनारयाला साथ लाटांची,
असते रात्रीला साथ आकाशातील चंद्राची,
जशी नेहमीच असते ओढ नदीला सागराची,
जशी दुःखामागुन लागत राहाते आस मनाला सुखाची,

तशीच मनपण पाहु लागते वाट त्या आवडणारया व्यक्तीची,
तिची वाट पाहाता पाहाता अनाहुतपणे ओघळलेल्या अश्रुंची,
तेंव्हा अचानक लागु लागते चाहुल तुझ्या येण्याची......
आणी मग होणारया मनोमिलनाची..

माझ्या मनातील तुझ्या अमर अश्या स्थानाची
मी देतोय ना ग्वाही आज माझ्या प्रेमाची
"शांततेचा शोध घेताना" देशील ना गं साथ माझी....

नकळतचं.........





हे स्वप्न आहे की कल्पना,
आज काही केल्या कळेना.
कित्येक वर्ष जे स्वप्न होते माझ्या मनी,
तोच स्वप्नातील राजकुमार आज आला माझ्या जिवनी....

तो राजकुमार जिवनात माझ्या अनाहुतपणे आला,
दिवस सरु लागले तसा तो मनामध्ये घर करुन बसला,
एकमेकांना समजुन घेताना नकळतच मने जुळली,
प्रत्यक्षात त्याला भेटण्याची हुरहुर मनी लागली....

वरुन मी शांत असले तरी,मनात एक वादळ होते.....
भुतकाळातील आठवणींचे, काटे मनाला बोचत होते......
त्या सारयाला सामोरे जातमी त्याला भेटले....
माझ्या मनातील सारे भाव घाबरतचं त्याला बोलले....
आज स्वप्न माझे पुर्ण झाले,तो माझ्या सोबत होता...
सागरकिनारी सुर्य मावळताना,हातात त्याचा हात होता.....

प्रेमाचा निशीगंध बहरु लागला,
शुक्रतारा अधिक तेजाने चमकु लागला.....

पण...............

माझं मन अधीर झालं,
त्या राजकुमाराला सांगण्यासाठी
मी फक्त तुझीच आहे प्रत्येक जन्मासाठीच
फक्त तुझीच रे.............

तुझे सुखः ते माझे सुखः
तुझे दुःख ते माझं दुःख
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझी तुलाच साथ असेल

आणी...
त्याबद्दल मला एकचं हवयं देशील ना?
आयुष्य सरेपर्यंत तुझीच साथ..............

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी




तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.