Monday, December 8, 2008

एक क्षण




काळ्याभोर केसांत तुझ्या
क्षणभर तरी बुडु डे
केसांच्या बटा सावरताना
आज तुला पाहुदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

हात तुझा हातात आल्यावर
स्मित ओठांवर पसरु दे
गजरा माळतांना केसांत तुझ्या
मीच फुल बनुन फुलु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तुझसाठी फुलपाखरु
तुझ्या तळव्यावरी बसुदे
होईन घन निळा मी
तुला चिंब करुन जाऊदे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे

होईन तान मी त्या कान्हाची
तुला गुंग करुनी जाऊदे
होईन मोरपीस मी तुझसाठी
वा-यावरी मज ऊडु दे
हास प्रिये एकदाच मला
क्षणभर तरी जगु दे
नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

मन


मन मोगरा मोगरा
मन सुगंधाचा झरा
मन पहाटेचे स्वप्न
कल्प्नांचे बंध तोडुन

मन स्वच्छंदी पाखरु
मन गोंडस कोकरु
मन पाऊलांच ठसा
मन बिलोरी आरसा

मन असते समई
मन प्रकाशाची आई
अम असते लेखणी
मन सत्याची टोचणी

मन असते लाजळु
मन उडणारी वाळु
मन कसलेसे चिन्ह
मन असते एक प्रश्नचिन्ह

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तुला पाहातो


गार गार वारा
एक गोड शहारा
तृण पानांपानांतुन
मन घेई उंच भरारा

एक आभाळ गहीरे
तुझ्या डोळ्यांत दाटले
अन मोग-याचा गंध
तुझ्या श्वास कळ्यांतुन

चंद्र नभीचा दडला
काळ्या केसांच्या बटीत
बट गालावर ढळे
मन करण्या मोकळे

अधीर ते श्वास
मवळतीचे जणु उन
आणी मनीचे उधाण
तुझ्या चांदण्याने आणीले

लपलेला तारा कुठेतरी
तुला छळतो आतुन
मन असतो हे खुळे
थोडं जपलेलं बरे

चंद्रालाही लाजवेल
तुझी कोमलही कांती
थोडे ठेऊन अंतर
तुला पाहातो चोरून

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तोच मी


स्वप्नांत भासणारा तोच
मी सत्यांत दिसणारा तोच मी
नेहमीच होतो असेन कायम
तुझ्या श्वासांत गुंतणारा श्वास मी

ओठांतील तुझ्या शब्द मी
डोळ्यांतील तुझ्या आभाळ मी
दुःखातही असेन सोबत तुझ्या
गालावर ओघळणारा अश्रु मी

गवताच्या पातीवरील दवबिंदु मी
रात्रीत चमकता काजवा मी
मरणाला कवटाळेन नेहमीचा आनंदाने
ज्योतीवर प्रेम करणारा पतंग मी

मनात तुझ्या असणारा तोच मी
आर्त साद देणारा तोच मी
तुला निखळ हसवणारा तोच मी
अन त्या स्मितावर जगणारा तोच मी

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

तु विसरु शकशील ?


तु विसरु शकशील
आपण एकत्र घालवलेले क्षण
गप्प मारताना,
कित्ती रात्र जागल्या आपण
ते तुझं अगदी अल्लड हसणं
अनं ते लटकेच रागावणं
विसरु शकशील?
जेंव्हा होती गरज तेंव्हा नेहमीच एकत्र होतो
शरीराने दुर असलो तरी मनानं.....
नेहमीच कुणालाही सहज हेवा वाटावा
इतकं जवळ...... अगदी नेहमीच
शब्दच नसायचे कित्तेकदा व्यक्त व्हायला
असायचा तो फक्त एक पुसटसा हुंकार
ते गुंतणारे श्वास
अन नेहमीच सोबत सावलीचे भास
विसरु शकशील ?
बोलणं नाही झालं की डोळ्यांत पाणी
जग पालथं घालायची तयारी व्हायची
अन तितक्याचच यायचा.......
अगदी न चुकता तुझा फोन
जणु माझी साद पोहोचली तुझ्यापर्यंत
सारं वातावरण् कसं व्हायचं अगदी धुंद
अनं त्या धुंदीत तु न मी कसे बेधुंद

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)