Monday, September 17, 2007

दोन क्षण फक्त.....


दोन क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री

ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे

तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो

भावनांच्या एका दुरच्या
गावी एक वेडा राहातो
क्षणोक्षणी जागेपणी
तुझी स्वप्ने पाहातो


मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत

असेच नेहमी घडत होते
मन माझे झुरत होते का जाणे
तुझी एक झलक पाहाण्यासाठी
डोळे मात्र झुरत होते

Thursday, August 23, 2007

चार ओळींचे जग २




अनेक जण येतील
जवळ सुखःत तु असताना
बघ शोधुन तरी एकदा
सापडेन मी दुःखातही तु असताना

आहे जिवनाच्या संगीतामद्ये
मैत्रीची साथ सांग
काय होईल माझे वाईट
जर हातात असेल तुझाच हात

प्रेम् बिम सारे झुट
असे अनेक लोक बोलतात
तेच लोक पुढे जाऊन
प्रेमावर कवीता करतात

जिवनाच्या वणव्यात जेंव्हा लागु लागते दुखाची झळ
जेंव्हा अश्रुंनी भरुन जाते ओंजळ
तेंव्हा एक हात असतो नेहमीच जवळ
आणी बोलतो फक्त एकदा मागे तर वळ

संकटे आली पर्वतांसारखी
तर आभाळासारखे होऊन
बघ स्वतःसाठी जगताजगता
दुसरयांसाठीही जगुन बघ

जेंव्हा जेंव्हा दरवळतो रातराणीचा सुवास
जेंव्हा जेंव्हा होऊ लागतात स्वप्नांचे भास
हास ना प्रिये एकदाच हास
नाही करवत एकट्याने हा प्रवास

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

आयुष्य


मराठी मला वाटायचे नकळत अनेकदा
तिही माझ्यावर करते प्रेम,
मनात दाटून यायचे अनेक प्रश्न
वाटत असेल का तिलाही सेम,
मला ति प्रचंड आवडायची
तिला मी काहीही सांगीतले तरी
लटके लटकेच रागवायची
रागावली असली कितीही माझ्यावर तरीही लाडात येऊन बोलायची.
लाजरयाबोजरया मधाळ भाषेमद्ये मनातली गुपीते फोडायची
कधी माझ्याशी भांडायची कधी माझ्यावर रागवायचीही.
माझ्या कवीता वाचता वाचता कधी अवखळपणे हसायचीही
अवचीत कधी एखादे पानउलटताना वहीचे एक दोन टिपे गाळायची.
पण मला माहीत नव्हते की ति मला फक्त "बेस्ट फ्रेंड" मानायची

दिवसांमागुन दिवस गेले मैत्री आमची फुलत होती
दिवसा तर असायचीच समोर हल्ली स्वप्नांत देखील तिच होती
अश्याच एका रात्री अचानक तिचा फोन आला
मला वाटले की कदाचीत तिलाही प्रेमाचा साक्षात्कार झाला
पण............
नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते
माझे आजवर हक्काचे असलेले ते प्रेम आज दुसरयाचे होते
मला त्याने मागणी घातली हे बोलताना ति थोडीशी लाजत होती
कधी नाही ति आज बोलताना थोडी अडखळत होती
मी मात्र अगदी नेहमीसारखी तिची थट्टा केली
त्यामुळेच का होईना त्या वेडीची कळी हळुवार खुलली
मनातुन मी मात्र पुर्णपणे खचलो होतो
तिला समजु नये हे सारे म्हणुन फोनवर मात्र हसत होतो
मी बोललो ह्या वेडीला एक वेडा मिळला
ह्या एका क्षणात माझा आधार हिरावून नेला
शरीराने जवळ असलो तरी मने मात्र आता दुर होती
कारण मला ति नेहमीच आपला "बेस्ट फ्रेंड" मानत होती

फोन तिचा ठेवल्यावर मी मात्र सुन्न झालो
डोळ्यांतल्या आसवांनी तिच्या आठवणी पुसु लागलो
त्या आठवणी जातच नव्ह्त्या मनात अजुनच दाटत होत्या
विसरायचा प्रयत्न करताना निष्फळत्या मात्र वाढतच होत्या
रात्र रात्र जागवत होत्या
कधी भावना होऊन अनावर कागदांवर उतरत होत्या
कधी कधी फोनवर बोलताना मी मुददाम तिला छळायचो
तिला हसवताना मनापासुन एकांतात मनसोक्त रडायचो
ति मात्र आजही तशीच बोलायची
मनातील गुपीते आजही हक्काने मलाच सांगायची
कधी अचानक बोलायची मला कि एकदा पुन्हा भेटायचे आहे
खुपश्या मनातल्या गोष्ठी तुला सांगायच्या आहेत
हीच ति ना जिच्यावर मी मनापासुन प्रेम करयचो
बोलयचा हे प्रयत्न केला की मी नेहमीच घाबरायचो
ति मात्र नेहमीच मला आपला "बेस्ट फ्रेंड" मानायची
मिळेल तुलाही एखादी जिवाला जिव देणारी असे नेहमीच बोलायची

तिचा संसार तिने थाटला मि मात्र एकटाच होतो
आयुष्याच्या वाटेवर मी एकटाच चालत होतो
मी कधीही तिला भेटलो नाही
तिला सामोरे जाण्याचे त्राणच माझ्यात उरले नाही
आपले प्रेम सुखी राहावी हीच सुप्त आशा त्यात होती
तिच्या संसाराची बसलेली घडी मला पुन्हा विस्कटायची नव्ह्ती
पण..........
तिच्या शेवटच्या क्षणी तिला मी शेवटी भेटलो
इतके दिवस दाबुन लपवलेल्या अश्रुंसकट बोललो
मला तिला त्या वेळी जास्त वेळ बघवले नाही
अन तिलाही जास्त काही बोलवले नाही
सारे काही तिने एका वाक्यामध्येच सांगितले
"मित्रा खरे मैत्र काय असते हेच तु मला दाखवलेस..."
बाकी काहीही बोलली नाही
आता तर बोलणारच नव्हती
मला आपला "बेस्ट फ्रेंड"मानणारी आता ह्या जगातच नव्हती
परत मी एकटाच होतो
तिच्या आठवणी काढत काढत दिवस निमुटपणे कंठु लागलो
आणी एक दिवस....
एक माणुस मला शोधतशोधत माझ्या घरी आला
माझ्या हातात वस्तु देत येतो मी म्हणाला
त्यावर चक्क मला आपला " बेस्ट फ्रेंड" मानणारीचे नाव होते
काय होते त्यात ते तिलाच फक्त ठावुक होते
मी पाणावलेल्या डोळ्यांनी ते पँकेट उघडले
त्यात माझे हरवलेले बालपण मला अचानक सापडले
आत मला उमगले की नेहमी माझ्याशी का भांडायची
सर्वासमोर माझा उल्लेख आपला "बेस्ट फ्रेंड" असाच का करायची
तिच्या त्या आठवणीच्या पेटीत बंद होते
आम्हा दोघांचे बालपण
आम्ही एकत्र मजेत घालवले ते नाजुक क्षण
थट्टा मस्करी, विनोद, भांडणे
सारे काही अगदी सारे काही..........
अन.....
शेवटचे पान वाचता वाचता माझं आयुष्यच बदलुन गेलं
त्या ओळींनी माझ्या जिवनामद्ये एक नवं वादळ आलं
"मला वाटते की त्याचे माझ्यावर प्रेम आहे
पण तो सांगत नाही
मी आपला "बेस्ट फ्रेंड" बोलल्यावरमनातल्या मनात हसतो
आपली गुपीते सांगतो अनेकपण हे मात्र सांगत नाही
त्याला माझ्या मनात काय चाल्लेय
हे सांगण्याची हिम्मत माझ्यात येत नाही
कधी तो माझ्याशी भांडतो
तर कधी माझ्यावरच कवीता करुन माझ्यापासुनच लपवतो
मला नक्की माहीती आहे की तो फक्त माझ्यावरच प्रेम करतो"

जणु माझ्याच भावना मि तिच्या त्या डायरीत वाचत होतो
मरणाच्या आशेवर जगतानाही दु:खच्या सरणावर जळत होतो
नियतीनी काय क्रुर खेळ माझ्यासोबत मांडला होता
मा क्रुर थट्टा करण्याचा अजब डाव रचला होता
काय गरज होती मला जाणीव करुन द्यायची
की तुला आपला "बेस्ट फ्रेंड"माणनारी
तुझ्यावर खरोखर प्रेम करायची .....................


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

Tuesday, August 7, 2007

ति आणी पाऊस


त्याला पाऊस आवडतो,
तिला पाऊस आवडत नाही,
भेटायचे तिने ठरवल्यावर
पाऊस भेटुच देत नाही,
म्हणुनच त्याला पाऊस आवडतो
पण तिला पाऊस आवडत नाही,
आहे कुठल्या जन्मीचे वैर दोघांत कुणालाही कळत नाही.


ति त्याला भेटायला व्याकुळ झालेली असते
स्वप्नांच्या दुनीयेत भान विसरुन बसते,
ते दोघे भेटले की आभाळ दाटुन येते
अचानक आलेल्या पावसाने ति भिजुन जाते,
मग रागावुन पावसावर ति चालत राहाते
पावसाच्या नावाने मनात खडे फोडत राहते,

म्हणुनच
त्याला पाऊस आवडतो,
पण तिला पाऊस आवडत नाही

आहे कुठल्या जन्मीचे वैर दोघांत कुणालाही कळत नाही.
पाऊस पडतोय बघीतल्यावर तिचे मन अधीर होते
मनात असते वेगळेच काही दुसरेच काहीतरी बोलू लागते,
काय जाणे पावसामुळे तिची काय भांडण होते
पाऊस ओसरु लागल्यावर तिच्या चेहरयावर मात्रा हास्य खुलते,
म्हणुनच
त्याला पाऊस आवडतो
पण तिला पाऊस आवडत नाही
आहे कुठल्या जन्मीचे वैर दोघांत कुणालाही कळत नाही.

नेहमीच तुमचा
ओंकार(ओम)

Friday, July 20, 2007

शब्द.........


शब्द शब्द आज पुन्हा झुलू लागले
वेडे मन माझे आज अचानक
असे का झुलु लागले
स्वप्नांच्या हिंदोळ्यांवर अचानक
असे का खेळु लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

मनावरील निराशेचे ढग
काळे का पळू लागले
अन मग आशेच्या तेजाने
माझे जिवन चमकू लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

भावनांचे मेघ बनुन माझ्या
ते माझ्यावरच बरसु लागले
आणी मग चेहरयावर माझ्या
आनंद बनुन दिसू लागले
कोण जाणे का ? ते माझे
शब्दंशब्द आज जुळू लागले

नेहमीच तुमचाच

ओंकार्(ओम)