Monday, January 14, 2008

चार ओळींचे जग 3




खुपदा माझा एकटेपणा
कधीतरी माझ्याशी बोलका होतो
कुठेतरी कोणीही बोलले काहीही
तरीही मनात एक गलका होतो

तु सोबत असलीस की
मला कोणाचाही आधार नको
तु नेहमीच सोबत राहा माझ्या
बाकी मला काहीही नको

ज्या गोष्ठीची भिती होती
तेच होउन बसलंय
तुझ्याकडे पाठवत नाही म्हणुन
माझं मन माझ्यावर रुसलयं

खुपदा तुझ्या आठवणी
माझ्या मनात अनाहुतपणे येतात
पण त्या जाताना माझ्या मनाला
कल्पनांचे पंख लावुन जातात

मनातले गुपीत माझ्या
आज अचानक तुला कळले
ते गुपीत जेंव्हा डोळ्यांमधुन
अश्रु बनुन ओघळले

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Sunday, December 30, 2007

सर्वस्व




माझ्या कल्पनांचा निशीगंध
तुझ्या आठवणींशिवाय बहरत नाही
नाही ग सखे निदान ह्या जन्माततरी
तुला विसरणे काही शक्य नाही

तुझे ते श्वास धुंद करुन जाणारे
तुझे ते स्वप्नील डोळे स्वतःमध्ये गुंतवणारे
तुझे ते ओठ मनातलं गुपीत राखणारे
अनं तुझे ते केस श्रावणातील मेघाप्रमाणे भासणारे
सारं काही सारं काही

कधी विसरु शकेन
मला काही वाटत नाही
नाही हे काही शक्यच नाही
कारण...........

माझ्या प्रत्येक श्वासावर
आता तुझेच नाव लिहिले आहे
आणी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
आज फक्त तुझाच आहे

माझ्या भावना माझे शब्द
माझे सुःख माझे दुखः
सारं काही तुच आहेस
माझ्या प्रत्येक कवीतांतील
प्राणच सखे तुच आहेस

कारण तुच माझे प्रेम आहेस
तुच माझे सर्वस्व आहेस

तुमचाच नेहमी

ओंकार(ओम

तुझ्या आठवणींची मैफील







आभाळ दाटेल सारे
आणी पाऊस भरुन येईल
कुठुन तरी मनाच्या कोनाडयातील
तुझी आठवण मात्र जागी होईल

तु समोर नसशीलही कदाचीत
पण तो अजुनही तसाच असेल
तो रडत असेल वर
आणी मीही मनातून रडत आहे

थेंब थेंब पावसाचा जणु
माझ्या प्रेमाची साक्ष देईल
तोही कदाचीत वाट चुकवुन थोडीशी
माझ्याकडेच घेऊन येईल

वीज कडाडली कदाचीत कुठेतरी
तर तु नक्कीच घाबरशील
माझ्या आश्वासक मिठीची
तूलाही कदाचीत कमीच भासेल

आणी मग तो आला
तसाच दुर निघुन जाईल
अन मग माझ्या आठवणींचे मैफील
मात्र पुन्हा सुनी होईल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, November 17, 2007

सारं काही.......




सारं काही आज पुन्हा आठवले
ते शाळेचे दिवस मला पुन्हा आठवले
शाळेतले सारे मित्र आठवले
नकळत झालेले पहीलं प्रेमही आठवलं
सारं काही का मला आज असे अचानक आठवलं

सारं काही असं काही अचानक घडलं
क्षणभर आत्ताच घडतयं की सारं असचं मला भासलं
न राहावुन मग गेलो एकदा शाळा बघायला
विचार केला जाऊ दोन चार क्षण स्वतःला विसरायला

तोच माझा लाकडी बाक
त्यावर कोरलेलं माझं अनं तिचं नाव
सरं काही आज तसचं होतं
माझ्या मनात मात्र आठवणींचे माजलेलं एक काहुर होतं

त्या आठवणींचे मोती वेचताना मन माझे भरत होते
वाळुप्रमाणे ते क्षण मात्र हातामधुन निसटत होते
शाळेत असताना वाटायचे हे वर्ग म्हणजे आहेत तुरुंग
जे नेहमी छेदतात नव्या उमेदीचे पंख
मात्र तेच पंख मला मदत करत होते
माझे भुतकाळात हरवलेले सुख मात्र सापडत होते

मन माझ्या वारयाप्रमाणे सगळीकडे बागडत होते
अन शाळेतले ते दिवस मग सहजच कागदावरती उतरत होते.

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

Monday, September 17, 2007

दोन क्षण फक्त.....


दोन क्षणांची ओळख
दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली
कोणीतरी सोबत असल्याची खात्री

ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे

तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो

भावनांच्या एका दुरच्या
गावी एक वेडा राहातो
क्षणोक्षणी जागेपणी
तुझी स्वप्ने पाहातो


मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत

असेच नेहमी घडत होते
मन माझे झुरत होते का जाणे
तुझी एक झलक पाहाण्यासाठी
डोळे मात्र झुरत होते