Sunday, June 29, 2008

तो हल्ली माझ्या डोक्यातच जातो


आजकाल तो जरा जास्तच शाईन मारतो
माझ्या ना हल्ली तो जरा डोक्यातच जातो
माझ्या सगळ्या मैत्रीणींशी तो नकळत मैत्री करतो
आणी काही दिवसांनी चक्क तिला प्रपोजच करतो
असे का वागतो हे मला समजतच नाही
त्याला काय समजावु हेच मला कळतच नाही

गर्लफ्रेंडला भेटायला गेलो की तोही तिथे अचानक टपकतो
अन मग आम्हा दोघांना तो पुरते पकवतो
हॉटेलात घेऊन जाऊन तो चांगली ऑर्डर देतो
आणी मग आलोच पैसे काढुन बोलुन तिकडुन चक्क सटकतो
थोडा एकांत हवा असतो आम्हाला का त्याला हे समजत नाही
आणी मग माझ्या प्रेयसीचे अश्रु माझ्याने मात्र बघवत नाहीत

तो निघाला तिथुन की मग ति माझ्यावर मनसोक्त रागवते
कधीकधी तर तिथुन चक्क निघुनच जाते
ह्या सा-या प्रकाराला मला जबाबदार धरले जाते
आणी मग तिला हसवता हसवता माझ्याच डोळ्यांत पाणी येते
सारं काही कळते तरीही तो असा का वागतो
माहीत नाही का पण तो हल्ली माझ्या डोक्यातच जातो

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

आहे असाच मी


आहे असाच मी
वातीवरच्या पतंगासारखा
आज आहे जगात
उद्याचा कुणाचा ठाव
कोरलेय माझ्या -हुदयावर
तुझेच नाव

तुटलेत बंध जरी नात्याचे
तरी आठवणींचे ओझे वाहतोय
मी दो-यातुन निखळलेल्या मोत्यांसारखा
अस्ताव्यस्त पसरतोय मी
स्वतःचे अस्तित्व विसरलोय मी
गुमनाम आयुष्य जगताना
तरीही हसतोय आजही तसाच
तिळतिळ करत मरताना
आयुष्यात माझ्या असे काही वादळ आलं
माझी ओळखच ने नष्ठ करुन गेलं
विसरलीस तु मात्र सहजतेने मला
माझं आयुष्य साफ बरबाद झालं

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, June 21, 2008

शिवरायांचा शंभुबाळ... एक सलाम


नावात काय आहे हा शेक्सपियरचा प्रश्न छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ह्या नावाबद्दल कुणीही विचारुच शकत नाही,ह्या नावातच सारे काही आहे. इतिहासकार, बखराकार व नाटककारांनी रंगवलेला व्यसनी, व्याभीचारी, शिवपुत्राच्या उलट गोरगरीबांच्या स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगणारा, शिवरायांच्या आर्शीवादाने औरंगजेब व त्याच्या लाखो सैन्याला अवघ्या साठ सत्तर हजाराच्या सैन्यानिशी सिंहासन घोड्याच्या पाठीवर ठेवुन लढणारा, जिवात जिव असेपर्यंत एकही किल्ला किंवा एकही गलबत शत्रुच्या हाती पडु न देण्याची शप्पथ घेणारा,अवघ्या बाविस तेविसाव्या वर्षी छत्रपतीपदाची काटेरी माळ गळ्यात पडुनही जमीनीशी नाते जोडलेला, आप्तस्वकीयांनी केलेल्या दगाबाजीचा नेहमीच शिकार झालेला हा जिजाऊंचा लाडका शंभुबाळ पार निराळा होता. त्या पातशाहाने हालहाल केले तरीही खजीना व आपल्या हितचिंतकांची नावे न फोडणारा व अवघ्या बत्तीसाव्या वर्षी मरणाच्या महामंदीरात हसत हसत जाणारा हा सिंहाचा खरा खुरा सिंहाचा छावाच होता ह्या इतिहासाने वाईट ठरवलेल्या पण कर्माने महान असलेल्या त्या आपल्या शंभुराजाला त्याच्या स्वराज्यातील एका जनसामान्याचा हा एक सलाम
ओंकार(ओम)




जगन्मातेचा पोत भुत्या
रात्रभर नाचवत होता
शिवाचा छावा हा संभाजी
रणांगणे गाजवत होता
हिंदवी स्वराज्याचा नवा छत्रपती
तो शोभला होता
भगव्याची गर्दन उंच राखायला
हिरव्या चंद्रता-याशी लढला होता
सुखात निजलेल्या स्वराज्याचे
स्वप्न उरी बाळगत होता

ज्ञानी होता न्यायी होता
मनाने पक्का कवी होता
कवी कुलेशांसारखा दोस्त
त्यांनी सहजतेने जोडला होता
स्वतःवरच्या आरोपांना
नेहमीच धैर्याने सामोरे गेले
जणु प्रत्येक अनुभवांना त्यांनी
कवड्यांचा माळेत गुंफले
जिव देईन पण किल्ला देणार नाही
अशी प्रतीज्ञा केली
मराठ्यांच्या पोरांची खरी ताकद
त्या औरंग्याला कळली

शिवरायांचा शंभुबाळ आज
पाख्-याला नाचवत होता
जणु आकाशात चमकावी
विज तसा सहजतेने तळपत होता
अनेकदा स्वकीयांनी त्यांचा
जिव धोक्यात आणला
पण त्यातुनही मार्ग काढत
तो अगदी सिंहासारखा लढला
लाखो माणसे तोफा
अंगावर धावुन आले
नकळत शंभुराज्यांच्या चेह-यावर
एक मंद स्मित आले

लढता लढता शेवटी
नियतीने त्याला फसवले
घरातले अगदी जवळचेच
मांणुस शत्रुला जाऊन मिळाले
जमीमदारीचा काळा पडदा
त्यांच्या डोळ्यांवर पडला होता
हा आपला राजा त्यांच्या
डोळ्यांमद्ये खुपत होता
त्यांचा हा घात आज
अपघात बनला होता
औरंग्याचा किमॉश उतरवणारा
संभा आज शत्रुंच्या हाती पडला होता

त्या तश्या अवस्थेतही
तो बेचाळीस दिवस लढ्ला
कदाचीत स्वराज्याचा मातीच्या
खालेल्ल्या शपथेलाच जागला
काळाने झडप घातली त्यावर
तेंव्हाही नाही डगमगला
बेखौफपणे तो म्रुत्युच्या मंदीरात गेला
शेवटचे बोल निघाले मुखातुन
जगदंब जगदंब

आणी सोबत सोडुन गेले काही न सुटणारे प्रश्न..................

नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

Thursday, June 12, 2008

सावरु शकलोच नसतो


तुझा स्पर्श टाळ्ण्याचा
आज प्रयत्न करत होतो
कदाचीत त्यानंतर मी
स्वतःला सावरुच शकलो
नसतो मिठीत तुला घेण्याचा
प्रयत्नही करत नव्हतो
खरेच एकदम खरे प्रेम
तुझ्यावरती करत होतो

तु माझ्या जिवनाचा किनारा बनलीस
त्या वेळी विरहाचे गित
मी लाट बनुन गात होतो
तेंव्हाही तुझा स्पर्श टाळण्याचा
प्रयत्न मी करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

तु बनलीस म्रुगजळ
मी शोधक नजर बनलो होतो
तु बनलीस कस्तुरीचा गंध
मी वाहणारा वारा आज बनलो होतो
तुझा स्पर्श टाळण्याचा
तेंव्हाही प्रयत्न करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)


Monday, June 9, 2008

उठ आतातरी.........


चंद रुपयांच्या चिरी-मिरी साठी
होऊ नको लाचार
ऊठ आतातरी मानवा
वाढला भ्रष्ठाचार

ज्ञान विज्ञानाची हाती
घे आता तलवार
होऊन जाऊदे रे गड्या
शेवटचा यलगार

द्यायचा नाही आता
कुठल्या हलगर्जीस आता थार
ऊठ आता तरी मानवा
करुनी पक्का निर्धार

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)