कधी कधी मी माझ्या आयुष्याचा विचार करतो
सारे दुःख विसरुन मग भुतकाळात प्रवेश करतो
सारे दुःख विसरुन मग भुतकाळात प्रवेश करतो
जुन्या आठवणींचा मग माग घेऊ लागतो
आणी मग वर्तमानातील हेवे दावे विसरतो
चांगले क्षण आठवले की मनातुन सुखावतो
आणी मग त्या क्षणांच्या आकाशामध्ये विहरतो
त्यावेळी मन माझं भावनावश होतं
आणी मग झालेल्या चुकांची आठवण करु लागतं
कधी कधी मन माझं नभ बनून बरसतं
कधी कधी ते डोळ्यांवाटे ओघळतं
बघणारयांना ते वरुन फक्त पाणी जरी वाटतं
तरी ते माझ्या तुटलेल्या मनाचं प्रतीबिंबच असतं
ना जाणे काय अचानक मन असं का दाटतं
मग त्या आठवणींच्या गर्तेत अजुन फसत जातं
मग कसाबसं ते त्यातुन बाहेर पडतं
पुन्हा असं करायचं नाही हे दरवेळी ठरवतं
पुन्हापुन्हा मन माझं तिच चुक करतं
का जाणे मन माझं मला असं का फसवतं
कसे बसे रडत रडत मग ते सावरतं
काव्य बनुन तेच सुखः दुःख मग कागदावर उतरतं
ते काव्य माझ तुम्हाला मात्र सुखावतं
आपणही करायला पाहीजे काव्य असं तुम्हालाही कधी वाटतं
जरुर करा कवीता जरुर बना कवी
व्यक्त करा भावना नाही बोलणार कुणी
पण ठेवा ध्यानात एक नाही सांगणार कुणी
कवी नाही फक्त सुखे भोगणारा
तर तो आहे दुःखरूपी विष घशात् ओतुन पचवणारा
स्वतः असला दुःखी तरी बाकीच्यांना ह्सवणारा
व व्यक्त करुन आपल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचवणारा
ओंकार(ओम)
No comments:
Post a Comment