.png)
आजवर केवळा मुर्खासारखाच वागलो
कसलाच विचार केला नाही
की कदाचीत तुही सोडुन जाशील मला
असा विचारच मनात आला नाही
माहीत होते की
तु असशील कायम माझ्यासोबत
कधीच सोडुन जाणार नाहीस
पण नियतीने असे का केले ?
का माझे वादळातुन सावरलेलं घरटं
असं एका फटक्यात उध्वस्थ केलं?
काय वाईट केलं होतं मी कोणाचे?
ज्याची एवढी मोठी शिक्षा दिलीय मला
तु नसशील आता माझ्यासोबत
माझे कौतुक करायला
माझी पाठराखण करायला
मला जगण्याचे ध्येय दाखवायला
माझ्यासोबत हसायला रडायला....
सांग ना कोणाकडे सांगु की
आता मला कसं वाटतेय
कोणीच नाहीय इथे
पार एकटा पडलोय
पण जाता जाता तु मला वचनात बांधुन गेलीस
हरणार नाही रडणार नाही
असे वचन घेउन गेलीस
आता कोणासाठी जगु कशासाठी कोणीच नाहीय
माझं हक्काचं
बाकी काहीच करु नकोस
परत ही येऊ नकोस
माझी शेवटची इच्छा आहे पुर्ण करशील?
माझं मरण तुझ्या जवळ यावं
कदाचीत तुझ्या मिठीत यावं
बोल् देतेस वचन इतकेच
बाकी काहीच नाही