Friday, January 1, 2010

शल्य


माझे दुःख माझे "प्रॉब्लेम्स" ह्याची काहीच किंमत नाही
कोणालाही ह्या जगात
मी मात्र सगळ्यांचा सगळ्यात सोबती
पण जेंव्हा खरीच गरज असते मला तेंव्हा कोणीच का नसते
मला सावरायला.... मला समजवायला....
का कोणीच नसतं…..

सगळीकडे “Compremise” ह्या शब्दाची सवयच पडलीय
आताशा मला
ह्या शब्दाखेरीज नेहमीच जगणेदेखील आता नकोस वाटतेयं
का इतकं महत्व आलेयं ह्या शब्दाला
की आता ह्यापुढे श्वासांचे मुल्यदेखील आता थिटं पडलय़ं’…

पायाखालची स्वतःची सावलीदेखील आज अनोळखी वाटतेय...
का? ते माहीत नाही पण
स्वतःवरचाच विश्वास उडतोय... ह्यात इतरांचा काय दोष....
दोषी फक्त एकच.... मी...
मीच जबाबदार माझ्या उदयाच्या पतनाला…..

कधी कधी वाटते सगळे सोडुन दुर निघुन जावे
आयुष्याच्या दिव्यावरची वात स्वतः चिमटीत पकडुन विझवुन टाकावी
मग मागे उरेल तो दिव्याच्या अस्तित्वाची खुण मागे सोडत जाणारा धुर
तोही फक्त काही क्षणांसाठी
बाकी काहीच नको
त्या दिव्याची आठवण म्हणुन…..

जाऊदे..... उगाच काहीतरी....
जा....तु.... ”Leave Me Alone”
मी होईन ठिक.... नेहमीच होत आलोय...
आजवर... अन आजही होईनच....
व्हावेच लागेल न?....
खरचं...
मी आणी मीच....
की मी विरुद्ध मी....
बस हाच सगळा घोळ...
आत मनात....

1 comment:

  1. Simply Great, अप्रतिम..ओंकार

    ReplyDelete