येशील सये कवेत तेंव्हा..
कळेल गुज मनी ह्या जपलेलं..
केलं..शब्दांत व्यक्त अनेकदा..
परी खोल मनांत लपलेलं
सये तुझ्या आश्वासक मिठीची..
साथ जेंव्हा मला लाभेल..
माझ्या बेरंग आयुष्याला...
तेंव्हा इंद्रधनुची किनार लाभेल..
खोल मनाच्या कोनाड्यात..
आजही तेच भिरभिरते वादळ असेल..
पण तरीही तु समोर असशील तेंव्हा..
मनांस माझ्या बहुदा तेंव्हा...
त्या सागराची गर्भीत शांतता लाभेल
पुसटसे होणारे अंतर दोघांमधले..
क्षणाक्षणांत मिटुन जाईल...
येशील सये कवेत जेंव्हा...
तेंव्हा मला माझ्याच अस्तित्वाची जाणीव होईल
आता पुरेसे झालेत सये..
अट्टहास जगण्याचे
सरलेत दिवसही बहुदा
आता आपल्या विरहाचे...
सारी जुनी जाळी टाकुन मागे..
मन नव्याने उभारी घेणार..
अन मग पुन्हा तुझ्याच कवेत..
सये बघ..मी नव्यानेच जन्म घेणार
Omkar

chhan....
ReplyDeleteAgdi Apratim .....
ReplyDelete