Friday, April 8, 2011

रानातली चेटकीण.

अरे नातवा खय चल्लस रे.?
आजोबा असाच जरा भटकुन येतो...
पन ह्ये वाटेन कित्याक मरे.?
तेना जाऊ नको...ती वाट बरी नाय..
आजोबा डोन्ट वरी...
ह्या काय?
अहो म्हणजे घाबरु नका....
मी मोठा झालोय आता
येतोच पटकन.....
अरे ऐक मरे....
मी दुर्लक्षच केल
आजोबा काहीतरी बोलत होते...
तसाच पुढे आलो...
अन त्या वाटेवरच पहीलं पाऊल
थोडे विचीत्र आवाज सतत कानात पडत होते...
कदाचित त्याचमुळेच
माझ्या -हुदयाचे ठोके चुकत होते.
जाऊदेना यार..आपण बस चालत राहायचे...
वाट सरेस्तोवर..
मन घट्ट केलं अन चालत राहीलो पुढे...
सारं वातावरणं तसं गुढं....
त्या शांततेतही अचानक कुठुन आवाज उठायचे...
कधी कोणाची तरी चाहुल लागायची..
मनांत त्याक्षणी भितीची एक लकीर उमटुन जायची...
तितक्यात कोण जाणे कुठुन
एक सावली पाठीमागे आली...
आता मात्र माझी सारी हिंमतच गळाली...
मी पळत होतो पुढे ती
सावली माझ्यापाठी येत होती...
मी मागे बघीतले की विचीत्रच हसत होती...
मी डोळे मिटुन रामरक्षा.... हनुमानचालीसा सुरु केली...
हळु हळु ती सावली 
तशीच माझ्या जवळ आली..आता मात्र मी खरचं खुप घाबरलो..
आता ती चेटकीण काय करेल मला
त्याचा विचार करु लागलो..
खाईल मला की गायब करुन टाकेल...
चेटुक करेल एखादं की प्राणी बनवुन टाकेल..
दोन क्षण काय करावं काहीच कळत नव्हते
भितीपायी माझ्याने डोळेच उघडवत नव्हते...
मन घट्ट करुन शेवटी डोळे मी उघडले
समोर बघुन आजोबांना आता थोडे स्थिरावले...
घोंगडं टाकुन खांद्यावर
आजोबा पाठीमागुन येत होते...
मी मात्र चेटकीण चेटकीण ओरडत धावत
त्यांना माझ्या पाठी धाववले होते...
माझ्या डोक्यावर हात ठेवत आजोबा
बस एवढेच बोलले
नातवा मोठो झालस..
पन ऐकल आसतसं तर आज
ही वेळ इली नसती...
खरचं इली असती रानातसुन चेटकीन तर
तुका धावाक वाटसुदा गावली नसती...

ओंकार

1 comment:

  1. hahahahaha chhan vatali kavita :)........... mi suddha bhutana ghabarate :P

    ReplyDelete