Monday, December 26, 2011

जगण्याच्या कला..




आडवाटेच्या माळरानावरचा केवडाही..
बघ ना...ह्या उन्हानं केवढा वाळलाय..
अन त्या पिवळ्या झालेल्या गवतालाही..
पुन्हा वणव्याचा ध्यास लागलाय

राख होऊन जन्म नवा घेईलही तो
उद्या कदाचित पावसांत उमलेलही तो..
पाऊलांना ओल्या तुझ्या चुंबेल तो..
पुन्हा तुझ्या पदस्पर्शाने मोहरेल तो

तो दुरदेशीचा पारवा आलाय पुन्हा परतुन..
ओल्या नदीस ओढ ओल्याच त्या रानातुन..
गुंजतेय साद..खुळी तीच तुला गहीवरुन..
भेट सखे धावत येऊन त्या माळरानावरुन.

कोसळेल तो घननिळा पाहाताच आज तुला..
बिलगशील गर्जताच नभ सखे तु अशीच मला?
तिच खुळी तु...अन तोच थोडा मी खुळा..
आहेत ह्याच मुळी माझ्या जगण्याच्या कला..

ओंकार




No comments:

Post a Comment