ह्या गर्दीत आपण...
अगदी असेच हरवायचो...
हक्काचं निळशार आभाळ..
एकमेकांच्या डोळ्यांत शोधायचो..
ह्या गर्दीत आपण
अगदी असेच हरवायचो
हसायचो रुसायचो...
क्वचित कधीतरी भांडायचो...
भांडुन भांडुन दमलो की..
स्वतःवरच रागवायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..
घ्यायचो आणाभाका सोबतीच्या
भविष्याची सप्तरंगी स्वप्ने रंगवायचो
तु व्हायचीस नकळतच गुंग
मी तुझी थट्टा उडवुन जायचो
ह्या गर्दीत आपण
अगदी सहजतेने हरवायचो..
भर पावसाच्या साक्षीने..भिजताना...
अगदी एकरुप होऊन जायचो...
त्या मावळतीच्या सुर्याला पाहायला...
त्या आडवळणाच्या नदीपाशी जायचो...
त्या गर्दीतही आपण...
काही क्षण वेगळे वाटायचो...
तोच तो किनारा...
अन तिची ती अल्लड नक्षी...
तिच्या सादेला प्रतिसाद देणारा..
तोच कुठलातरी चुकार पक्षी...
तोच मी...अन तीच तु...
सारं काही तेच जुनं...
अगदी नव्यानेच रोज अनुभवायचो...
ह्या एकांतात क्षणभर का होईना...
आपण थोडसं जगुन घ्यायचो...
बस.....थोडसं जगुन घ्यायचो...
ओंकार
तोच उनाड वारा..
तिच्या
पदरामध्ये गुंतुन गेला...
तुझ्या
धुंद श्वासांमध्ये...
बहुदा
तोही रंगुन गेला...
माझे
प्रेम...तुझ्यावरच्या कविता...
तुला
सांगुन गेला...
मी
ठेवलेल्या जपुन उरात..पाऊलखुणा..
तो
क्षणार्धात ताज्या करुन गेला
कालचा पाऊस...खरचं..बरेच
काही देऊन गेला...
खिडकी
बाहेर..रातकिड्यांची अखंड मैफील..
आकाशात
सौदामिनीची तिला साथ...
अबोल..अनामिक शब्द ..ओठांआड
लपलेले...
अन...मदहोश होत चाललेली...रात...
सगळं
काही....धुंद ...बेहोश....
तुझ्या
नजरेच्या जादुत..बदुहा...”झिंगलेलं”..
एवढं सगळं
क्षणार्धात देऊन गेला...
कालचा
पाऊस..सखे बरेच काही देऊन गेला...
त्या
भिजलेल्या पावसाने...
ओली
झालेली माझी प्रत्येक कविता...
अन
ओल्याचिंब कवितांत
नव्याने
उमललेलं माझं मन...
मनात
पुन्हा नव्यानेच दाटलेली तु...
तुझ्यासाठी
बेचैन..झालेला हळवा क्षण
त्या
बेजोड सुरावटीतही नव्याने..
प्रितीचा
सुर मिसळुन गेला...
कालचा
पाऊस... बरेच काही देऊन गेला...
खिडकीआडुन..बाहेर निसर्गाचं
नवसौंदर्य
अनुभवणारा मी...
अन..पाठीआडुन नकळतच बिलगलेली
तु...
तुझ्या
हळुवार स्पर्शात गुंतलेला मी..
त्या
क्षणांना डोळ्यांत नकळतच जपणारी तु...
भावनांना
शब्दांत गुंतण्याचे कसब देऊन गेला...
कालचा
पाऊस खरचं..तुला मला जवळ आणुन गेला
ओंकार
तु रुसायचं ,अकारणच भांडायचं
हसायचं ,एकमेकांना समजवायचं
आपलं नातं अगदी असचं जपायचं
सोबतीने..अगदी सारं शिकायचं
एकमेकांसाठी जगत राहायचं
स्वप्नांना...मुर्त रुप दयायचं
स्वप्नांच्या दुनियेत रंगुन जायचं
आयुष्याचं पान नव्यानेच लिहायचं
पानावर...असेल नविन अध्याय...
पावलाला लाभेल पुर्णत्वाचा न्याय...
श्वासांगणीक ध्येयाच्या जवळ जायचं
नव्या जगाला उमेदीने सामोरं जायचं
तु असचं हसत राहायचं
मी तुला बघत राहायचं
आयुष्यातलं चुकार वळण
सहजच मागे टाकायचं
अन मग तुझ्या अदांना
मी सहज..कवितांत गुंतवुन टाकायचं
ओंकार
सये नसतेस तु,
घरी जेंव्हा
आजकाल
खरचं काहीच सुचत नाही...
तुझ्या आठवांशिवाय...
विचारांमध्ये
इतर काहीच डोकावत नाही
मी घरी आल्यावर,
तुझं ते हळुवार हसणं
गालातल्या गालात
तुझं ते लाडीक लाजणं
नजरेच्या कोनाड्यातुन
अलगद बघणं
अन..माझं ते
अगदी सर्व विसरणं
तु नसताना
ह्यातलं काहीच घडत नाही
शब्द माझे कातर होतात....
उगाच मनास पंख देतात....
वेळी-अवेळी तुझ्यापाशी...
माझ्या मनाला खेचुन नेतात...
असे होऊ नये...असंही
कधीच मनाला वाटत नाही...
सये तु नसताना घरी....
आजकाल.......
खरोखरचं करमत नाही
ओंकार
आजकाल "सई"ची चर्चा...
जागोजागी होऊ लागलीय...
कधी नव्हे ती माझ्या चक्क
कवितांतही दिसु लागेलीय
माझ्या कवितांतली माझी "सई"
बरेचदा माझ्याच मनात असते...
अन तिच्यावरच्या कविता वाचुन...
एकांतात मनसोक्त हसत असते
"सई" तु समोर आलीस..की
माझेच शब्द माझ्यावर रुसतात
नसतेस समोर तु जेंव्हा जेंव्हा..
तेंव्हा श्रावणसरींसम ओघळतात...
"सई" रुप तुझे चंद्रासम..
अन चांदण्यासम दुधाळ काया...
तुझा शोध न घेता मी...
जन्म खुळे जाईल वाया...
त्या आकाशाच्या निळाईने
सागरापाशी..ओंजळ पसरावी...
माझी "सई" मला त्या..
उगवतीच्या किरणात सापडावी
ओंकार