Saturday, July 3, 2010

सांग येशील का? एकदाच...

भेटशील का  सखे चांदण्या न्हातील तेंव्हा
बिलगशील का एकदाच चुकेल ठोका काळजाचा जेंव्हा
भाव तुझीया मनातले लपवशील का तु पुन्हा
ओठ मिटुनी गाशील का मिलनाचे गान तेंव्हा
सांग येशील का? एकदाच...
वाहणा-या  वा-यात आज मोग-याचा वास आहे
बोटांवर उमटलेला तुझा ओळखीचा भास आहे
ओठ अबोल असले तरी नजर साद देत आहे,
लपवलेस ओठांनी जे तु तिच मला सांगत आहे
सांग येशील का? एकदाच...

गेलो मग मीही भिजुनी पावसात सखे आठवांत तुझ्या
आल्या दाटुनी आठवणी अवचीत ओल्या डोळ्यांत माझ्या
व्याकुळली पायवाट आज आकाशही थकुन गेले
तुझी पाऊले वाजलीच नाहीत रान सारे निजुनी गेले
सांग येशील का? एकदाच...
सांग ना फक्त एकदाच...
ओंकार

No comments:

Post a Comment