Friday, January 1, 2010

ती... अशीच आहे


तीला गप्पा मारायला खुप आवडतात
अनं मला गप्पा मारताना ती
तीला मनमोकळं हसायला खुप आवडतं
अनं मला मनमोकळे हसताना ती
तीला नेहमीच पावसात चिंब होऊन भिजायला खुप आवडतं
अनं मला पावसात भिजताना ती
तीला गायला खुप आवडतं
अनं मला गाताना ती
तीला फुलपाखरासारखं नाचायला खुप आवडतं
अन मला नाचतान ती
पणा का ठाऊक नाही तीला मी तितकासा आवडत नाही
पण मला फक्त तीच आणी तीच आवडते

का कुणास ठाऊक


खळाळते हास्य अगदी मनमोकळे नेहमीचेच..
पण आज ते हास्य ओठांवर असुनही डोळ्यात काहीतरी वेगळेच भाव होते
नाही काही तरी वेगळेच द्वंद सुरु होते मनात
तरीही तु अगदी सहजतेने लपवलेस ते सारं
अगदी माझ्या नकळत
पण तरीही ते शल्य जाणवतं होतंच मला
जे बोलुन दाखवायला तु टाळत होतीस...
का कुणास ठाऊक

कळत नकळत


कळत नकळत कधी जुळतात नाती
न सोडवता सुटते गुंतागुंत भावनांची
ॠणानुबंध म्हणावा की रेशीमगाठी
कोणी नाही कोणाचे पण तरीही जगतो एकमेकांसाठी
मी जाणार कुठे तुला सोडुन
मग जगायला ह्या देहात प्राण आणणार तरी कुठुन
जायचं असतं तर केंव्हाच गेलो असतो
पण खुप जास्त प्रेम आहे मनात जे येतं दाटुन

स्पर्श तुझा जाणवतो तु जवळ नसताना
भास अन आभास तुझा तुझी पाऊले वाजताना
मिठीत तुझ्या विरघळतो मग मिही
सारं काही विरघळतो ....
सारं काही विसरुन जातो...
तु कधीच मला सोडुन जाऊ नकोस
हीच इच्छा मनात बाळगतो
क्षणोक्षणी जाणवतायतं आज तुझ्या असण्याचे भासं
अन तरीही मनात असते तुझा मिलनाची आस
पण कितीही वाट पाहीली तरी तुझी पाऊले मात्र वाजत नाहीत
मनातल्या माझ्या मिलनगीताला चाल कधीच मिळत नाही
तुझ्या श्वासांत श्वास माझा एकरुप असा होऊन जातो
तुझा स्पर्श मला सुखावत असतो
तुझ्या सहवासात मी विरघळुन जातो
अन तुझ्या चेह-यावरचे समाधान डोळ्यांत भरुन घेत असतो

Sunday, November 29, 2009

जन्मोजन्मी


शोधत पाऊलखुणा तुझ्या आज मी फिरत होतो
गेल्या जन्मातले आपले नाजुक भावक्षण एकएक करुन आठवत होतो
तेच ते झाड….
ज्याच्या साक्षीने आपण अनेकदा भांडलो
अनेकदा हसलो, अनेकदा रडलो
एकमेकांसाठी एकमेकांसोबत....
आठवत असेल का तुला तो नदीचा काठ
अन तुला झाडामागुन चोरुनच पाहाणारा मी
तुही समोर उभी अंग चोरुन...
मनाला मोहुन टाकुन बेदुंध करणारा….
तो पाव्याचा नाद...
जणु खुळ्या प्रियकराने दिलेली….
आपल्या प्रेयसीला साद....
अन तु माझ्या मिठीत विसावलेली...
मिटलेले डोळे....
अन सगळे जग विसरुन जायला लावणारे ते भावक्षण....
सारं कसं एका क्षणात आठवलं....
पुन्हा एकदा.....
तो विरह जन्मोजन्मींचा....
पुन्हा तोच भास,
तोच आभास ओळखीचाच....
पण त्याक्षणी मनामध्ये अनाहुतपणॆ उठलेला एक प्रश्न....
की मला आज हे सारं आठवतयं पण तुला आठवतं असेल हे सारं?
सांग ना ?
देवजाणॆ हे सारं पुर्वीसारखंच असेल?
नेहमीसारखं असलेच तरी काहीतरी त्यात नवीन आहे
तु जवळ असुनही तु दुर असल्याचाच भास आहे
हे सारं आहेच पण...
तु जवळ नसतेस तेंव्हा मन माझं पिसं होतं
लाख रोखायचा प्रयत्न करतो पण ते सारखं तुझ्याकडेच धाव घेतं

असा मी नाही


जन्मोजन्मी राहावा लक्षात असा मी नाही
चंद्र सुर्याप्रमाणे तेजस्वी असाही मी नाही,
फिनीक्स पक्षासारखं राखेतुन उडण्याचं सामर्थही माझ्यात नाही,
नाही मी कोणीच नाही…..
बस जाईन मग असाच हळुच विस्मरणात,
अजरामर स्थानी अढळ असा ध्रुवतारा मी नाही,
आयुष्य माझे क्षणभंगुर दिव्यावरची फडफडती एक वात आहे,
अंत नसलेली वळणावळनाची बिकट भयावह वाट आहे
त्यावरच जगायचे
कधी हसायचे
कधी रडायचे
बस चालत राहायचे
कोणताही प्रश्न न विचारता.......
अन आयुष्याच्या अश्याच एखाद्या वळनावर त्या धुक्यामध्ये हरवुन जायचे
कोणत्याही खाणाखुणा पाठी न ठेवता....
बस..........