Wednesday, January 31, 2007

तुझी भाषा


ह्रुदयाला हेलावणारी तोलावणारी तुझी भाषा
मनाला तारणारी वारणारी तुझी भाषा
बोलण्याबोलण्यात कोड्यात पाडणारी तुझी भाषा
वेड्या जिवाला भुरळ पडणारी तुझी भाषा
मनाचा निशिगंध फुलवणारी तुझी भाषा
आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळणारी तुझी भाषा
कधीकधी हसवणारी रडवणारी तुझी भाषा
नकळतच खुणावणारी तुझी भाषा
कधीकधी समजवणारी उमजवणारी तुझी भाषा
मनामध्ये घर करणारी तुझी भाषा
श्रावणातल्या पहिल्या सरीसारखी वाटणारी तुझी भाषा
तुझा शब्दंशब्द माझ्या ह्रुदयात भरला
बोलायचा आता फक्त एकच शब्द उरला
सर्व गोष्ठी ह्या काही बोलून दाखवायच्या नसतात
काही गोष्ठी नकळतच समजून घ्यायच्या असतात

तु विसरू शकशील का?





तु विसरू शकशील का?
भेटण्यासाठी पाहीलेली वाटअश्रुंचे खळखळणारे पाट
ह्रुद्यात ओथंबणारे प्रेमओठांवरून अलगद टिपलेला थेंब
तु विसरू शकशील का?

तो रुसवा तो फ़ुगवा
तो सहवास हवाहवा डोळ्यांतील ति व्याकुळता
ति श्वासांची अधिरता
तु विसरू शकशील का?

एकमेकांसाठी भांडलो सर्वांसोबत
घेतली शप्पथ राहु सोबत
आठवायची काय गरज आहे मला
मी तर नेहमी तुझ्या राहणार आहे

शरीरापर्यंत
कधीच पोहोचायच् न्हवतं मला
पोहोचायच होतं मनाच्या खोल गाभारयात
तिथे तर केव्हांच पोहोचलोय मी
दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी

तरीही राहीन सुप्तावस्थेत पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी
लागतील काही जन्म उलटतील काही जन्म
पण मी तर् तुझाच आहे
प्रत्येक जन्मासाठी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

तु नसतेस तेंव्हा काय होते







तु नसतेस तेंव्हा काय होते
मनाचं हलक पिस होते
वारयावरून अलगद उडत
तुझ्याकडेच धाव घेत

नघतेस तेव्हातुझा हळुवार स्पर्श असतो सोबत
तुझा मधुर आवाजसतत माझ्या कानात घुमत
तोतु नसतेस तेंव्हा डोळेतुझीच् आतुरतेने वाट पाहातात
तु येण्या अगोदर तुझ्या आठवणी धावत येतात

तु नसतेस तेंव्हा असाच मि शांत असतो
गहिरया काळ्या डोळ्यांमध्येमाझे आभाळ शोधत असतो
बरसणारया त्या नभांमध्येमाझा चंद्र शोधत असतो
तु नसतेस तेंव्हाकाय काय सांगु काय काय होतं

मनातला पारिजात बहरत नाही
अंतःकरणात मोर नाचत नाही
अंगावर चांदणे बरसत नाही
रातराणीचा सुगंध दरवळत नाही

विसरतात शब्द आपला अर्थ
जिवन होते माझे तुझ्यविना व्यर्थ
तु जवळ नाही असे कधीच होत नाही
तु जवळ नसलीस तरीतुझी आठवण जात नाही

तुझी आठवण मनात नसेलातेंव्हा मी कदाचित ह्या जगात नसेन



-तुमचाचॐकार

मैत्री

मैत्री म्हणजे विश्वास
धिर आणी दिलासा
मैत्री म्हणजे जिवांमधील सेतु
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणी तु

दोस्तीचा
शिरकावा असा का
आभाळातुन होत नसतो
जिवाचा जिवलग जोडायला
आधी जिव लावावा लागतो

संकटे
समोर येत होती
जिवनात माझ्या धोका बनुन
तारलेस तु माझे जिवनसावरणारा हात बनुन
मैत्री फ़क्त म्हणण्यापुर्ती नसावीतर ति निरंतर असावी
जशी सागराला किनारयाचीअखंड साथ असावी

ॐकार

कविता

मनाच्या नितळ आरश्यावर उमटलेले शब्दांचे सुरेख प्रतिबिंब म्हणजे कविता
हळुवार उलगडलेले एखद्याचे अंतरंग म्हणजे कविता
स्वताला विसरण्याचा क्षण म्हणजे कविता
शब्दांच्या झुल्यावर झुलणारे मन म्हणजे कविता

शब्दांमद्ये जपलेले बालपण म्हणजे कविता
अवचित कधीतरी मिळणारा भावक्षण म्हणजे कविता