Friday, October 9, 2009

हा धागा


हा धागा साधा नसुन
माझा मैत्रीचा इरादा आहे
हा रंग साधा नसुन
माझा मैत्रीचा वादा आहे
हा सुगंध साधा नसुन
तुझ्या केसातल्या गज-याचा आहे
ह्याचा तु स्विकार करावास
हिच माझी इच्छा आहे
तु जेंव्हा माझ्याशी बोलत नाहीस
मला दिवसभर करमत नाही
तु माझ्याशी मैत्री करशील
असा पक्का विश्वास मला आहे
ही कवीता मी तुझ्यासाठी लिहीत आहे
तुझ्यापुढे मैत्रीचा हात पुढे करीत आहे


नेहमीच तुमचाच

ओंकार (ओम)

दान


नेहमीची मळलेली वाट ऒळखीचीच
अन मीही तोच ओळखीचाच बस…..
आज नवीन भासली ति तुझी अनामीक चाहुल
तो पायातील पैजणांचा नाद….
अन तुझ्या श्वासांचा गंध
तु जवळ नसतानाही जवळच असल्याचा भास
बाकी सारं कसं नेहमीचंच.....
पण तरीही काहीतरी वेगळंच भासत होतं
का ते देवास ठाऊक
का ते देवास ठाऊक तुही आलीस नेहमीसारखीच
श्रावणातल्या सरीसारखी "श्रावणी" बनुन
पण आज ओढ वेगळीच होती
अन मीही तिथे असुनही नसल्यासारखाच.....
माहीतीय तुला लोक बोलतात
की तुम्ही कवी तुमचे जिवन फार "रमणीय" आहे
पण कसं कायं सांगु त्यांना
की माझ्या दारात "दान" मागायला आलेलं
आज माझेच "मरण" आहे


नेहमीच तुमचाच

ओंकार (ओम)

Tuesday, September 22, 2009

तु अबोल....


बोलायचे असते खुप काही
ऐकायचे असते खुप काही
पण त्याचवेळी नेमकं
काहीतरी बिनसतं बहुतेकदा
अन मग....
काहीच नाही... काहीच नाही....
शब्द संपावर जातात जणु
अन मग उरतात
ते काही पुसटसे संकेत
काही बोभाटे....
अन त्या पलीकडच्या काठावर उभा असलेला मी ...
अजुनही... तिथेच....
तो बेभान वारा जणु, स्पर्श करुन तुला अजुनच बेभान होतो
दाटुन टाकतो आसमंत अन मग वेड्यासारखा घुमत बसतो

पण तु तिथे असुनही नसल्यासारखीच कुठेतरी हरवलेली.... अबोल....
डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या
अन सारे बंध तोडुन तिथुन ओघळणारा एक अश्रु...
जणु शिंपल्यातला मोतीच.....
मग सारी अंतरे मिटुन जातात
अन उरतात ते
तुझा स्पर्श झालेला मी..अन माझा स्पर्श झालेली तु
बस्स.... बाकी काहीच नाही.....


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

कल्लोळ.....


प्रश्नांत गुंतलेले प्रश्न
नुसताच काहुर उठवणारे
-हुद्याचा वेध घेणारे
अन....
मनावर सतत घोंघावणारी वादळे ...
एकामागुन एक.... मनावर धडकणारी वादळे....
वादळांपुर्वीची वा नंतरची ति भयाण शांतता कुठेतरी हरवलेली....
अन तितक्यात त्या भयाण शांततेचा पदर चिरत ऐकु येणारी एक आर्त किंकाळी
कोणाची? काय ठाऊक ?
कोणीतरी विव्हळतयं ? रडतयं ....
मरतयं ?
पण कोण ते? कोणास ठाऊक....
का रडतेय ते? कोणासाठी ?
मन असावं ते ... असलंच तर ते कोणाचं?
काय माहीत ? का हा सारा खटाटोप......
डोळ्यांत दाटणारं पाणी....
अन अलगद तुटणारा बंध..
मनाचा मनाशी...
अन निर्मीलेला अन अनाहुत बंध...
कधीही न शमणारा मनाचा वेध घेणारा...
कोणाच्याही नकळत मारणारा...
फक्त कल्लोळ.....

काही गाणी मनामधली



डोळे भरुन स्वप्ने अन मन भरुन गाणी
बरसतात हल्ली मेघही अश्रु बनुन पाणी
मन मिटुन पापण्यांमध्ये चिंब ओले दु:ख
त्याच ओल्याव्यात विरघळुन जाते क्षणभंगुर असे सुख:
काही गाणी मनामधली ओठांवरच थिजुन जातात
मेघमल्हाराची धुन गाताना नकळतपणे हरवुन जातात
मुक्तपणे हसताना अचानक ओठांवर खुलुन येतात
एकांतामध्ये रडताना मनामध्ये दाटुन येतात
काही गाणी मनामधली जगण्याला नवे ध्येय देतात
ओढ अनामीक लावुन जिवा एक बंध रेशमी जोडुन जातात


नेहमीच तुमचाच

ओंकार (ओम)