आता ठरवलेय मी....
मी पण सत्याग्रह करणार...
माझ्या खुळ्या मनाविरुध्द....
आता मीच आवाज उठवणार....
नको कोठली आश्वासने...
नको कोणती घोषणाबाजी...
नको...ती फसवी स्वप्ने...
नको...ती हळहळती मने...
माझ्या मनातल्या त्या मला...
आता मीच थांबवणार...
माझ्या मनाविरुध्द आता
मी सत्याग्रह करणार...
सत्याग्रह ऐसा जाहला..
सरले सारे उपाय...
मन हरले शेवटी माझ्यापुढे...
टेकले त्याने पाय...
कोणाशी नको...मन जुळवणे..
नको...कोणाची सहानुभुती..
माझ्या जगण्यावर नकोय आता
पुन्हा मन...जुळण्याची भिती..
माझ्या पाऊलांची दिशा
आता मीच ठरवणार..
माझ्या मनाविरुध्द आता
मी सत्याग्रह करणार....
ओंकार
Tuesday, January 25, 2011
Monday, January 24, 2011
मन...वेडं
मन...वेडं ऐकेचना...
तुझ्या नसण्याला मानेच ना..
घेत राहाते शोध...
खुळ्यासारखा....
एका जागी थांबेच ना...
वेडं मन ऐकेचना...
ओठ...लाजरे...
जणु पाकळ्या गुलाबाच्या....
केस...मोकळे.....
मेघ नभीचा....
आठवांत हरवणे...
माझे कायम तुझ्या....
तुझ्या पाऊलखुणा...
का? सापडेना.....
वेडं मन ऐकेचना....
ओंकार
तुझ्या नसण्याला मानेच ना..
घेत राहाते शोध...
खुळ्यासारखा....
एका जागी थांबेच ना...
वेडं मन ऐकेचना...
ओठ...लाजरे...
जणु पाकळ्या गुलाबाच्या....
केस...मोकळे.....
मेघ नभीचा....
आठवांत हरवणे...
माझे कायम तुझ्या....
तुझ्या पाऊलखुणा...
का? सापडेना.....
वेडं मन ऐकेचना....
ओंकार
Sunday, January 23, 2011
ओरखडा..
प्राणच काय तो...
प्रत्येक श्वासही..
उगाच ताणलेला...
हुंदक्यासरशी उमटलेला..
खोल मनावर ओरखडा...
क्षणार्धात वाटे...
असंगत...असंबंध...
क्षणीक वाटे...
तर्कसंगत..
मन खुळे असतं बहुतेक..
सारे मनाचे खेळ....
ओरखड्याआडुन.....
पुसायचा लाख प्रयत्न केला..
पण
तो केवळ वाढलेला...
अस्पष्ठ...
करुन टाकणारा नजरेला...
तोच....ओरखडा...
काचेवरचा...
मनावरचा......
ओंकार
ये न सये मिठीत माझ्या....
बस....
असं सतवणं खुप झालं..
सखे ये
मिठीत माझ्या
तुझं जवळ असुनही
दुर असणं..
आता खरचं पुरे झालं..
का अशी वागतेस.?
आपल्यातलं अंतर पुरेसं नाही का?
जे हे पुन्हा अंतर आणतेयस....?
नको न सखे
ये न मिठीत माझ्या...
एक एक करुन
किती स्वप्न रंगवलीत..
तुझ्या माझ्या मिलनाची...
सखे....तुझ्या आशेवरच..
चालतायत पाऊले...
वाट पुन्हा एकदा जगण्याची.
ते तुझं सोबत असणंच...
आता पुरेसं आहे...माझ्या श्वासांना बांधुन ठेवायला....
तुझं हसणं पुरेसं आहे...
नाटकी रुसवा...सोड सये...
ये न सये मिठीत माझ्या....
ओंकार
Saturday, January 22, 2011
वेदनेचा गाव
वेदनेचा गाव दडवलेला...
प्रत्येकानेच खोल मनात.
निशब्द हुंकार का बोलतो..
सारं क्षणांत
उमटलेला तो घाव
प्रत्येक पावलात
लाल गुलाबे प्रेमाची...
वाळुन् गेलेली...
एक कहाणी वेड्याची...
अर्धीच राहीलेली..
तडकलेला आरसा..
प्रतिबिंब लपवणारा..
बंद खिडकीआड
कहाणीच सरलेली...
शांत अश्या सांजवेळी..
थरथरते...उगा...
दिव्याची वात
उमटलेला तो घाव
प्रत्येक पावलात
ओंकार
प्रत्येकानेच खोल मनात.
निशब्द हुंकार का बोलतो..
सारं क्षणांत
उमटलेला तो घाव
प्रत्येक पावलात
लाल गुलाबे प्रेमाची...
वाळुन् गेलेली...
एक कहाणी वेड्याची...
अर्धीच राहीलेली..
तडकलेला आरसा..
प्रतिबिंब लपवणारा..
बंद खिडकीआड
कहाणीच सरलेली...
शांत अश्या सांजवेळी..
थरथरते...उगा...
दिव्याची वात
उमटलेला तो घाव
प्रत्येक पावलात
ओंकार
Subscribe to:
Posts (Atom)




