आता ठरवलेय मी....
मी पण सत्याग्रह करणार...
माझ्या खुळ्या मनाविरुध्द....
आता मीच आवाज उठवणार....
नको कोठली आश्वासने...
नको कोणती घोषणाबाजी...
नको...ती फसवी स्वप्ने...
नको...ती हळहळती मने...
माझ्या मनातल्या त्या मला...
आता मीच थांबवणार...
माझ्या मनाविरुध्द आता
मी सत्याग्रह करणार...
सत्याग्रह ऐसा जाहला..
सरले सारे उपाय...
मन हरले शेवटी माझ्यापुढे...
टेकले त्याने पाय...
कोणाशी नको...मन जुळवणे..
नको...कोणाची सहानुभुती..
माझ्या जगण्यावर नकोय आता
पुन्हा मन...जुळण्याची भिती..
माझ्या पाऊलांची दिशा
आता मीच ठरवणार..
माझ्या मनाविरुध्द आता
मी सत्याग्रह करणार....
ओंकार
No comments:
Post a Comment