Thursday, January 20, 2011

हळवी

पुन्हा मी
हळवी होत होते..
कान्हा तुझी वाट पाहुन
वाटा भिजवत होते..
कोणी बोले तु राधेचा..
कोणी बोले तु मीरेचा..
या....रुक्मीणीस कोणीच का
पुसले नाही?
मी आजही तशीच होते...
सरत्या वेळेसोबत..
आजही...
मी पुन्हा हळवी होत होते...
त्या मीरेची भक्ती नाही..
अन राधेचे प्रेमही नाही..
पण माझी ओढ...
का कधीच कळली नाही..
माझ्यातली श्रीसखी कान्हाची...
का कोणालाच दिसली नाही....
दिसली नाही....

ओंकार

4 comments:

  1. superbbbbbbbbb ........ avadali kavita ........... kharach rukminila hi kadhi tari ase vatale aselach na ....

    ReplyDelete
  2. kiti janin barobar tila aplya navrache prem share karave lagale ...

    ReplyDelete
  3. kiti sunder kavita ahe....

    ReplyDelete