Friday, January 14, 2011

मुखवटा.....अडगळीतला...

तथ्य...कशात होतं..
जरा सांगशील का?
त्या तुझ्या
ओघळणा-या डोळ्यांत...
की त्या कातर आवाजात...
मीच फसलो....
कायमच...
कसं जगायचं
अन कसं मरायचं....
कोणाकोणाला
अन कसं मारायचं..
सारीच माझी रुपे..
अन मी...तो...
मुखवटा.....
अडगळीतला...

ओंकार

1 comment: