Sunday, January 2, 2011

अव्यक्त

तुला काय वाटलं...
मी तुझ्यापासुन दुर होऊन
नाही जगणार?
हा समज तुझा
पार चुकीचा होता...
मी त्या काळालाही हरवलयं...
केवळ....
पुन्हा एकदा उभं राहाण्यासाठी
व्यक्त करुन मरण्यापेक्षा.
अव्यक्त राहुन झुरणं बरं..
निदान उद्या जगातुन जाताना..
हिसाब शिल्लक राहाणार नाही
कोणाचाही

ओंकार

No comments:

Post a Comment