Sunday, January 30, 2011

दान..

मन गुंतोनी पडीयेले..
ऐसे तारुण्य तुझे...
वेड लावुन जातसे..
सखे...ते लाजणे तुझे...
तिचं लाजणं...म्हणजे..
आयुष्यातली करवट..
अन तिचं हासणं म्हणजे..
सुखःचा प्रत्येक क्षण
भरभरुन जगण्याचं वचनं घेऊन..
ती प्राण घेऊन निघुन गेली..
मी उरलो....
पान गाळलेल्या झाडासारखा..
तटस्थ होऊन...
पुन्हा पालवी फुटण्याची वाट बघत
मीच माझं मरण मागितलेलं
माझ्या श्वासांना मीच रोखलेलं..
मरण आलं दारात मागायला दान..
तेंव्हा..प्रत्येक पाऊलांगणीक..
त्याला त्याचं खुजेपणं कळलेलं

ओंकार

No comments:

Post a Comment