Friday, January 7, 2011

संपलेले श्वास

धीर अजुन किती ठेवायचा..
तुझ्या माझ्या मिलनाचा..
रंग अजुन किती फासायचा..
बस पुरे झाले...
जगण्याचे उसासे..
किती प्रयत्न केला
तरी श्वास चिमटीतुन
अलगद निसटायचा..
घोड्याची चाल पटावरची..
कधीच का नाही समजली..
मी वाचत राहीलो
"वझीरा" पासुन.
अन त्या "घोड्याने"
मला मात दिली...
सारे संपलेले श्वास 
उगाच चिमटीत धरले..
तुझ्या फिरल्या पावलांना..
मी माझ्या शब्दांत रंगवले...


ओंकार

No comments:

Post a Comment