भर..पावसात...
त्या तुफानाच्या
एक घरटं मोडलेलं..
एक नातं मुकपणे
जे आयुष्यभर जपलेलं
आयुष्य ते तु मजला दिलेलं....
उगाचचं विस्मरलेलं
नात्याच्या भिंती
अन..प्रेमाचा ओलावा..
इवल्याश्या पंखात..
तुझ्या सोबतीनं..गरुडाचं बळं आलेलं
लोकांसाठी फक्त
त्या अडगळीच्या कोनाड्यात
होतं चिमणीने घरटं बांधलेलं...
पण तुझ्या सोबतीनं
मी त्या अडगळीतही
स्वतःच विश्व उभारलेलं....
इवल्याश्या पंखानं दयायचो...
आव्हान सुर्याला...
बहुदा मान्यही नव्ह्तं
तेही आपल्या नशीबाला..
चिमणा चिमणीचं....घरटं...
तेही अचानक मोडुन गेलं..
कोसळत्या नभांखाली
मला वाचवताना
चिमणीचं..ओरडणं..अचानक थांबलेलं..
आता उरलेय ते एकाकी....
आयुष्य तु मला दिलेलं...
विस्कटलेलं..
ओंकार
No comments:
Post a Comment