अजुनही ऐकु येतायत का
तुला ते माझे श्वास ...
हळुहळु पुसट होणारे...
जणु एखादा हिमनग...दिसेनासा व्हावा..
तश्या एक एक आशा...
विरळ होत गेल्यात
आता खरं सांगु तर
तुझी वाट बघतोय....
खचलोय...आत मनात...
हरणं...सहनं करणं ,,,
इतकं कठीण असेल
ह्याची पुसटशी कल्पनाही
कधी मी केली नव्हती
म्हणुनही असेल कदाचीत...
आजवर केवळ यश आणी यश...पाहीलं...
अपयश....
ह्या चार शब्दांचं विष
आज शरीरात इतकं भिनलयं...
की आताशा श्वासांचे मोलही
चुकते करण्याची हिंमत उरली नाहीय...
आता कोणाकडुन काहीच अपेक्षा नाही....
माझ्या पतनाला...
कोणीच जबाबदार नाही...
कारणीभुत तो मीच....
सगळेच संपलेय....
सांग न रे सख्या...
निदान तु तरी माझा आहेस का?
नेशील का रे तुझ्या सोबतीनं...
शांत निजण्यासाठी....
आता खरचं असह्य झालयं.
ओंकार
No comments:
Post a Comment