Monday, January 10, 2011

आयुष्य गोठलेलं

आज किती तरी दिवसांनी
आयुष्य पुन्हा
गोठल्यासारख झालयं
काय ठाऊक...
जीव पुन्हा का बावरलायं...
तुझ्याशिवाय..
आज खरचं खुप एकटं झालयं
पटावरच्या सोंगट्या
नकळत मांडल्या..
अन सांडल्या...
आकाशातल्या त्या चांदण्यादेखील..
तश्याच....
केवळ तुझ्यापायी भांडल्या...
आयुष्याकडुन काहीच नको होते..
हवी होती ती केवळ
निरव शांतता..
थोडं बोलकं होण्यासाठी

ओंकार
(संतोष कुडतरकरच्या "आयुष्य गोठल्यासारखे झालंय" ह्या चारोळीतुन पहीली लाईन घेऊन सुचलेली कविता....
चुकभुल द्यावी...घ्यावी)

1 comment:

  1. आयुष्याकडुन काहीच नको होते..
    हवी होती ती केवळ
    निरव शांतता..
    थोडं बोलकं होण्यासाठी

    chhan ahet kavita :)

    ReplyDelete