Friday, January 7, 2011

सखी...चंद्र...अन कातर रात

तो मावळतीचा चंद्र...
अन सरत आलेली रात..
बरेचसे मौन..
अन ती तुझी हवीहवीशी साथ
वाटेवर सांडलेला..तो चुराडा
चांदण्याचा...थोडासा..बोचणारा..
अन नभीचा चंद्र...पाहुन ते..
उगाच थांबणारा..सांडणारा...
रात्र सरता सरता.
एक एक पान...अलगद उलटते.
त्या उलटलेल्या प्रत्येक पानांवर..
सखे तुझ्या माझ्या मिलनाची एक खुण असते....
अंत अन सुरवात..
दोन्ही मीच ठरवल्यात..
फक्त एकदा मागे वळुन बघ..
तुझ्यासाठी...
आकाशातल्या चांदण्या
मीच सजवल्यात
श्वास अन भास..
दोहोंचाही मेळ...बसता बसेना..
थरथरती रात्र कातर झालेली..
तुझ्याशिवाय सरता सरेना.
बस...आता कहरच झालाय..
असं सतावणं एखादयाला बरं नाही..
कित्तीदा सांगु तुला मी अजुन.
ये धावत...अशीच...
असं तिष्ठत ठेवण बरं नाही...

ओंकार

1 comment: