Wednesday, January 26, 2011
बस....एक रुपया...
सकाळचा प्रसंग...
स्टेशनवर....नेहमीची
धावपळ सुरु..माझी...
ट्रेन पकडायचीय...लवकर..
तेवढ्यात समोर आलेला एक हात...
हातात...तिरंगा....सर शर्टपे लगा लो...
बस.."एक रुपया"..
बस...करोडो हिंदुस्थानींना...
ज्याचा गर्व असायला हवा...
तोच तिरंगा....बस....एक रुपया...
तसाच नको...म्हणुन हात समोर केला...
दोन तिन पाऊले टाकलीच असतील...
पुन्हा...सेम...
आणी सेमच वाक्य....
आता मात्र...डोक्यात जाळ पेटला....
अन सहजच डोळ्यात उठलेले अंगार...
स्टेशन वर...पोहोचेपर्यंत किमान....
पाच सहा वेळ तसच...
सहज विचार...डोक्यात आला...
ज्या..तिरंग्यापायी...कित्तेक ...
घरांचे दिप...विझले...
अन अजुनही विझतायत....
त्याचे...मोल....बस...एक रुपया...
एक दिवस....तिरंगा...
छातीवर मोठ्या गर्वाने मिरवायचा..
अन संध्याकाळपर्यंत....
बस...पायदळी तुडवायचा...
नको...असलं देशप्रेम.......
खरचं किव येते.....
चिखलात....रस्त्यावर.....बेवारस.पडलेले..
फाटलेले..झेंडे बघुन...
हेच करायचे होते...
तर विकत घ्यायचंच कशाला?
नको...असलं नाटकी देशप्रेम....
बाहेर पडलो...स्टेशनवरुन...
बाहेर एक अंध व्यक्ती....
बाचकत चालत होती....
त्यापेक्षा....त्या...डोळस आंधळ्यांना
खरचं..नजर नव्हती...
धक्का मारुन जात होते...
सगळे त्याला...
पण मदतीचा हात...रस्ता पार करण्यासाठी...
एकही पुढे सरसावला...नाही....
मी...गेलो पुढे....
त्यला विचारलं...कुठे जायचंय तुम्हाला...
ती व्यक्ती...बोलली.....257 च बस स्टॉप.
नेऊन सोडलं...
त्या स्टॉपजवळ...तितक्यात बसही आली....
चढता चढता...ती व्यक्ती....
एवढचं बोलली...
दहा मिनीटे उभा होतो...कोणी मदत केली नाही...
"धन्यवाद"...
आणी हो..."हँप्पी रिपब्लिक डे"...
मी निषब्द........
गर्दीत हरवलेला...
ओंकार
(माझी माझ्या सर्व मित्र मैत्रींना...एक कळकळीची विनंती आहे...उद्या येता जाता...कुठेही..तुमच्या नजरेस..असा एखादा...बेवारस...चुरघळलेला...झेंडा सापडला..तर प्लिज तो उचलुन ठेवावा...
झेंडा मिरवण्यापेक्षा....झेंडा वाचवणं.. हेच खरं देशप्रेम..
हो न?)
ओंकार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
chhan ahe avadali :)
ReplyDelete