Wednesday, January 19, 2011

काळी रात्र

वाट पायांखालची...
अशीच हळुहळु मागे सरली..
वेळ सारी अनाहुतपणे..
वाळु बनुन निसटली,
कालची रात्र माझ्या
आयुष्याची काळी रात्र ठरली.

शोधण्याचा प्रयत्न आजन्म करीत होतो..
वाटेवरची उनाड वळणे..
का कधीच मला न कळली..
कालची रात्र माझ्या
आयुष्याची काळी रात्र ठरली.

मुखवटा सांडला..चेहरा हरवला...
शब्दही माझे फितुर झाले
ओळख पुसट होती माझी...
विस्मरणात तशीच हळुवार गेली..
रात्र सरली..ओळखही पुसली....
माझी कहाणी संपुन गेली.

खरचं कालची रात्र माझ्या
आयुष्याची काळी रात्र ठरली


ओंकार

1 comment: