आता माझे कान आतुरलेत...
आवाज कानी पडेल अन..
धावतच येऊन बिलगशील तु...
श्वास गुंतलेले..तुझ्याच स्वप्नात..
बंधने तोडुन येशील तु..
पुन्हा जन्म घेऊन..
अधुरी कहाणी पुर्ण करायला...
तो राजकुमार स्वप्नातला
सत्यातही भेटणार..
आज नाही झाली तर...
निदान पुढच्या जन्मी
त्यांची कहाणी पुरी होणार..
वचन दिलेयस..
पुन्हा भेटण्याचं..
सगळा विस्कटलेला...डाव
पुन्हा एकदा मांडण्याचं
पुन्हा प्रेमात पडायचं.
अजुनही वाटतं तुला..
त्या रंग गेलेल्या स्वप्नांना..
पुन्हा एकदा रंगवायच?
साथ देण्यासाठीच तर
परत आलोय..
त्या सरणा-या श्वासांनासुध्दा
रोखुन आलोय..
थरथरत्या त्या तुझ्या
कातर शब्दांनी
एवढं जखडुन ठेवलयं मला
रंगवुन टाकुयात..
ते क्षितीज
पुन्हा एकदा..
तु साथ देशील तर...
सारं ठिक होईल..
पुन्हा एकदा जगण्याचं स्वप्न..सत्यात येईल
ओंकार
chhan ahe
ReplyDelete