Sunday, January 2, 2011

जाण्याआधी

मी तुझा तर
कायमच होतो...
अन राहेनही..
बस....बदलले आहे...
ते...अंतर...
कारण आता....
पुन्हा तुझ्या कवेत येणं,,,
माझ्यानं शक्य नाही,,
तु येशील तेंव्हा असाच .....
ये अन क्षणांत मला
दुर घेऊन जा..
आता बाकी
काहीच नकोय मला...
आयुष्याकडुन..
माझ्या जाण्याचा
कोणालाही त्रास नकोय...
सगळं कस....शांत शांत...
अन डोळ्यांत पाणी
देऊन जाण्यापेक्षा..
ओठांवर हासु,
खुलवुन जायचयं...

ओंकार

No comments:

Post a Comment