शब्द शब्द जोडुन मी
तुझ्यासाठी...लिहायचो...
तुला ऐकवताना,
तुझ्यासाठीच्या कविता..
मी खरचं तुझ्या डोळ्यांत हरवायचो...
तुही गेलीस...
अशीच मला त्याक्षणी एकटा सोडुन..
मी उरलो...
मी माझ्या त्या खुळ्या शब्दांसोबत...
पुन्हा एकटाच.....
अन मग क्षणभर...वाटुन गेले...
आता पुन्हा कधीच लिहायचे नाही..
सरळ उठुन ती पानेच जाळली....
तुझ्यासाठी जी निळी केली होती...
तशीच सोडुन दिली....
नंतर पाहीले तर काही जळुन गेली होती...
तर काहींवर होते उरलेले
डाग कायमचे....
अगदी माझ्या मनासारखे....
ओंकार
No comments:
Post a Comment