सगळेच प्रवासी...
"प्राक्तना"पासुन...."वर्तमानापर्यंत"...
सगळ्यांच्या वाटा ठरलेल्या...
सगळ्यांच्या पाऊलखुणा
त्या भिजलेल्या वाटांवर उमटलेल्या
आता अजुन किती ठिकाणी...
आभाळाला ठिगळ लावायचं...
एका ठिकाणी शिवुन झालं की
आभाळ दुस-या ठिकाणी फाटायचं...
बस..वाट शोधत चालत राहायचं..
त्या क्षितीजापार,
खुणावणा-या सावलीकडे...
आजची चिंता नाही...
उदयाची पर्वा नाही...
बस....एकच विचार...
पुढे चालण्याचा
प्रवासीच मी....वाटेवरुन चालणारा...
सहज येता जाता,
तुमच्या मनात डोकावणारा...
कधी अलगद....
वाटांवर "पाऊलखुणा" सोडणारा..
अन कधी..
मनात "अजरामर" होणारा..
ओंकार
No comments:
Post a Comment