Friday, January 7, 2011

वेदना

आता माझी वेळ आहे....
बस.....उठायचयं..
पुरं झालं ते,
राखेत पडुन राहाणं.
तप्त लाव्हारसात..
आता पुन्हा
पंख पसरायचेत...
पण...खोल मनात
एकच खंत राहीलेली
की राखेतुन उठताना..
बाकी सारी बंधने
तुटुन गेलीत..
बस....शिल्लक राहीलेली
ती नाळ...त्या लाव्ह्याशी...
प्रत्येक श्वासांगणीक..
जगण्याची नवी उमेद...
जाणवतेय..
पंख पसरुन उभा राहीलोय..
आता..
ती गतजन्माची वेदना आठवतेय....

ओंकार

No comments:

Post a Comment