त्या डायरीच्या
जळक्या पानांची राख...
काल मी कानाजवळ नेली...
ते अजुनही....
तुझेच नाव घेतायत...
तुझ्यापायी जळुनही
ते तुझ्यासाठीच झुरतायत...
त्या जळक्या पानांवरचा
शब्दंशब्द..
माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची
ग्वाही देतोय...
अन त्यावरचा
तो आगीचा डाग..
तुझ्या दग्याची
शब्दांना निक्षुन सांगीतलेय मी...
की आता बास....
तिच्यापायी झुरणं नको
अन पुन्हा एकदा मरणं नको
कहाणी ऐकवतोय..
भावनांशिवाय शब्द म्हणजे..
प्राणाशिवाय शरीर...
दोन्ही निरर्थक....
केवळ जळण्यासाठी.....
राख होण्यासाठी....
वाट बघत...
ओंकार
chhan ahe
ReplyDelete