आयुष्य
आडव्या तिडव्या रेघोट्या..
चौकटीत बसवलेल्या..
काहीश्या सापडलेल्या...
जिर्ण पानांवर
काहीश्या धुळीने माखलेल्या
आयुष्य...
असाच पटावर मांडलेला डाव..
अनिश्छीततेने भरलेला..
आयुष्य...
अंधार मंतरलेला...
आयुष्य प्राजक्ताचा सडा....
दगड तासुन बनवलेला...
असाच...निसटता कडा..
अजिंक्य.....
पुढच्या क्षणी काय असेल
ते न सांगणारा..
ओंकार
No comments:
Post a Comment