बरेचसं मौन दडवलेलं..
अन डोळ्यातलं पाणी..
त्या ओल्या पापण्यांआड अडवलेलं
भावनांचा पुर ओसरला...
भावनांचा पुर ओसरला...
निळं आकाश मोकळं झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी...
डोळ्यामध्येच सुकुन गेलं...
विचारतील जाब..मुकपणे..
विचारतील जाब..मुकपणे..
त्या वाळलेल्या मोग-याच्या कळ्या...
तुझ्या पैजणाची पाहात वाट...
पुसलेल्या...वाटेवरील पाऊलखुणा...
वेदनेचा गाव अनामिक.....
वेदनेचा गाव अनामिक.....
आसवांनी वेढलेला..
तुझ्या माझ्या मिलनाचा..
तो क्षण..असाच थिजलेला..
ओंकार
खरच खुप छान आहे कवीता.
ReplyDeleteमाला खुप आवदली........