Friday, January 14, 2011

फसवी अंतरे..

कधीकधी अंतरे...
अशी फसवी असतात...
कवेतल्या क्षितीजाला...
दुर घेऊन जातात..
अन कधी...
क्षितीजापारची...मनं..
नकळत जुळुन जातात..
वाट चुकलेल्या वाटा..
आताशा...
उगाच वळसा घेतात..
अन त्या भळभळुन
वाहाणा-या जखमा..
एक पुसट उसासा
भरुन घेतात..

ओंकार

1 comment: