आता का कंप सुटला..
तुझ्या त्या नापाक हातांना...
माणुसकीचा घोट लागत होता न
आजवर...तुझ्या त्या प्यादयांना..
नुसतचं बोंबलायचं..
सोबत आहोत तुमच्या..
नकळत सोडायचे मुक्त हात..
घ्यावा बळी आमचा...
नुसतं वाहातं रक्त....
नी....नंतर उजाडलेली ती पहाट...
प्रत्येक अंगणात गजबलेला..
तोच नेहमीचा....थरथराट...
तोच..चिरागातला जीन..
आज तुमच्यावर उलटलाय..
तुमच्या प्रत्येकाच्या मागे तो..
आता हाथ धुवुन लागलाय..
आता तुम्हालाही कळतील वेदना..
कोणालातरी गमावल्याच्या..
तोवर...फक्त सहन करा..
कारण....
जैसी करनी वैसी भरनी...
आता कळेल तुम्हालाही
की तुम्ही काय कमावलं..
नी काय गमवलं..
ओंकार
No comments:
Post a Comment