Tuesday, February 1, 2011

दगड


मी दगड
आडवाटेचा..
कण्हणे..प्राक्तन
माझे बहुदा..
नियमांचा बांधील...
मी समाजाचा..
एक कोणी येतो..
शेंदुर फासुनी जातो.
नकळत दुजा येतो.
हात जोडोनीया..
तीसरा करी
नामाचा घोष..
चौथ्याचे दोष
मी निवारेन.
मीच माझा होतो..
माझ्याशी बोलका...
उगाच गलका...
भक्तांचा..
शेंदुर फासुनी
देवत्व लाभले..
कोणी न जाणीले
माझे मन..
तोच मी दगड...
आडवाटेचा....
काळ बदलला
देव तो बनला..
मनीचा दगड मी..
दगडच राहीला


ओंकार



1 comment: