Monday, February 14, 2011

"वेल विशर"...

डोळ्यात देऊन पाणी
जगायला लावुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


क्षणापुर्वी जे स्वप्न होते..
मनामध्ये जपलेले...
तेच स्वप्न....तुटुन डोळ्यांमध्ये रुतलेले...
स्वप्नांचा तिरस्कार येईल असे बोलुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


तोडुन गेली शपथा...
अन नाती मोडुन गेली...
विषाचा प्याला हातात देऊन
जगायला सांगुन गेली...
जाता जाता ही काळजाचा
पुर्ण चुरा करुन गेली...


शेवटचे शब्द....
तु तुझ्यासाठी जगायला शिकावास हिच इच्छा होती..
तुला ते जमलेय
चांगली गोष्ठ आहे...
थँक्स...
मे गॉड ब्लेस यु ऑलवेज
तुला हवं ते त्याने तुला दयावं
सुखी राहा....
तुझीच "वेलविशर"....


हाहाहा....काहीही......
जगण्यासाठी...दगा....
तोही इतका?
ती गेली...
की मी काढली...
माहीत नाही.....
पण एक मात्र खरं..
जाता जाता...प्रेमाचं खरं रुप दाखवुन गेली...


ओंकार

4 comments:

  1. kai dardi kavita ahe re ........... tuzya bahutek kavitan madhye ajunahi tich dokavatey .... pan visaraycha prayatn kar ata tila ....... karan je apale asate te aplyala sodun kadhich jat nahi .... may be someone better than her tuzya aayushyat devane lihili asavi .... aajubajula ekda baghayacha praytna tari kar .... Best wishes for ur future.

    ReplyDelete
  2. माझ्या कडे ति माझ्या आयुष्यात होती तेंव्हा तिने मला पाठवलेले SMS होते ते जपुन ठेवले होते...त्यादिवशी बसुन सगळ्या आठवणी पुसुन काढल्या तर हा तीचा माझ्या शेवटचा संवाद होता तो....पण डिलीट केलाय.तसंही तिला आयुष्यातुन वजा केल्यावर बरेच काही छान वाटतयं....

    ओंकार

    ReplyDelete
  3. very heart touching.......mala khup aavadali hi kavita...

    ReplyDelete
  4. tumachi varachi comment waachali.Mi aadhihi ekada mhanalo hoto ki mi je jagato pan shabdaant naahi maandu shakat,te tumhi karta.Comment fakt evadhech saanganyaasaathi ki mi hi asach anubhavatoy(--तसंही तिला आयुष्यातुन वजा केल्यावर बरेच काही छान वाटतयं);n boltaahi aamhi tumachya maage-maage aahotach-follower...!

    ReplyDelete