Friday, February 4, 2011

विस्तव

 आता हवेत..
येणारा...तोच उग्र गंध..
ओळखीचा असेलच तुमच्या...
नसलातरी,
जाऊदेना....त्याचं तुम्हाला काय?
सारंच अनपेक्षीत...
माझं अस्तित्व....विखरलेलं..
राख बनुन...
माझं मीच मला थांबवलं होतं..
त्या एका छोट्याश्या विस्तवाने
मला जाळलं होतं
प्रत्येक पावलांगणीक...
पुसट होत जातील माझ्या आठवणी.
अन विस्मरणातही जाईन असाच...
तरीही उरेन कदाचीत...
खोल -हुदयात...पुन्हा अंकुरण्यासाठी...
पण तुमचं प्रत्येक पाऊल
वाटेवरच्या राखेत माखलं. होतं..
त्या एका छोट्याश्या विस्तवाने
मला जाळलं होतं
माझं असणं माझं नसणं..
क्षणभंगुर....
हे ही त्या विस्तवानेच ठरवलं होतं..

ओंकार

        

No comments:

Post a Comment