तो विचार करता करता..
क्षणभर थबकलेला...
प्रत्येक पाऊलांगणीक..मुठीतुन
एक एक श्वास असाच निसटलेला..
श्वासही खुळे...अन पाऊलेही..
दोघेही कुठे नेतील आयुष्याला..काहीच नेम नाही..
अन मी मात्र असाच निरतंर चालत..
नशीबाला दोष देत...
कधीतरी वाटते...तो देवही
माझ्या विरुध्द आहे बहुतेक.
रोज नवनवीन संकटे आपसुक देतो..
पण दुस-या क्षणी साक्ष पटते..
की नाही..
त्याचा आहे विश्वास पडेन पार
म्हणुन तर तो परीक्षा घेतो
ओंकार
good one ... i like it
ReplyDelete