प्रत्येक श्वास आताशा बोथट झालेला...
प्रत्येकानेच स्वतःचा हिसाब लिहीलेला..
किती आले कित्तेक गेले...
प्रत्येक श्वासांगणीक निसटलेल्या मी असाच थिजलेला...
प्रत्येक शब्दांतुन माझं भळभळतं
मन आज असं काही बोलकं झालं...
की प्रत्येक डोळ्यांआडचं आभाळ...
आज नकळतच भरुन आलं
ओघळलेल्या त्या प्रत्येक थेंबात...
पुन्हा प्रतिबिंब तुझचं होतं...
माझ्यापासुन दुर गेलीस तरी....
डोळ्यातलं चांदणं मात्र तुझचं होतं
माझ्या मनांत डोकावणारी तु...
आज अचानक का पुन्हा शब्दांत अवतरलीस...
इतक्या दिवसांनतरही पुन्हा एकदा....
सारं का आठवांत देऊन गेलीस
नकळत भांडायचे तुझ्याशी...
की पुन्हा तुझ्यात गुंतुन जायचे....
सावरायचे...आवरायचे मनाला...
की पुन्हा स्वतःला हरवुन घ्यायचे
कधी कधी तुझ्यात स्वतःचे अस्तित्व शोधण्याचा
केवीलवाणा प्रयत्न करतो मी...
शोधतो...थकतो....पुन्हा नेहमीसारखाच...
विरक्त एकटाच उरतो मी....
लिहुन संपायचे...की संपुन लिहायचे...
सांग ना तुझ्यापायी मी आता अजुन काय काय करायचे...
तु....कोण ह्याची पुसटशी कल्पना नाही....
तरीही तुझ्यापायी हे सगळं मी का करायचे?
माझी ओळख बनलेले माझे शब्द....
कधी कधी माझ्याशी दगा करतात...
मी लाख ठरवतो नाही आठवायचे तुला...
पण कुठेतरी तुला आठवुन जातात
पुन्हा प्रत्येक थेंबात साचशील तु,
कधीतरी डोळ्यातुनही वाहशील..तु...
एखाद्या कवितेतही डोकावशील तु...
दुर जाऊन माझ्यापासुन एवढी ...
माझ्या जवळ तितकीच राहाशील तु...
उचललेलं प्रत्येक पाऊल आजचं..
तुझ्या पाठमो-या सावलीपासुन दुर घेऊन गेलं..
मन माझं फितुर झालं...
नकळत तुझ्याच कडे राहुन गेलं....
आता पुरे झालं...
प्रेम बीम सारं झुट...
बस यार उगाच अवास्तव
स्तोम माजलेलं...
भर उन्हात एक रान
असचं वणव्यात जळलेलं..
ओंकार
No comments:
Post a Comment