तुझं असणं... तुझं नसणं
तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं
तुझ्यापासुन दुर जाऊन
जे मिळालं...ते सुख मला खुणावतं..
असचं नेहमीचं आयुष्य...
अन तेच नेहमीचं रडगाणं..
त्या रडगाण्याचं कुरकुरणं..
आता मला सतावतं...
खरचं तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं
नको तो अट्टहास...
कायम जगण्याचा...
त्या जगण्यातलं...मरण...
कायमच का जगायला लावतं
तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं
तु अन मी...
एके काळी होतो..शरीर अन प्राण...
आता बस..दुणावलेलं..अंतर...
श्वासांमधलं..
त्या श्वासांच गणीत...
सुटता सुटता का चुकतं
तुझ्या असण्यापेक्षा...
नसणं मला सुखावतं
जगतोय...मी अन जगेन कायम,
तुझी आठवण ..मनातुन पुसेनही कदाचीत...
पण अजुनही एकांतात मन...अधीर का होतं...
माहीत नाही का पण....
कुठेतरी खोल मनात....
माझं प्रेम...अजुनही तुलाच शोधतं
अजुनही फक्त तुलाच् शोधतं
ओंकार
very nice...superlyk for last stanza :)
ReplyDeletechhan ahe
ReplyDeleteby the way,'wellwisher'chi original 'comment' maage waachanyaat aali hoti,nehamisaarakhech saangane-mihi aathavani pusun kaadhalya hotya -agadi tasshshyaach paddhatine...(Amol Chitte)
ReplyDelete