Saturday, February 5, 2011

राधेय...

जखमांची क्षिती
न बाळगता तो आजन्म लढला..
लढला शत्रुंशी...आप्तस्वकीयांशी....
तो म्हणजे साक्षात काळ..
तरीही आजन्म हिनकुळातील म्हणुन....
दुरावलेला...
मैत्र....वचन....अन दान....
ह्या सा-याचं सार म्हणजे
राधेय....की कौतेयं
ज्याने त्याने ठरवावे
त्याचे वागणं...
निती अनितीच्या पलिकडे होतं..
हे मात्र नक्की...
दुर्योधनाशी मैत्र..
कान्हाशी बंध..
अन कुंतीला भर रणात दिलेले...वचन...
पाच पुत्र परत करण्याचं...
सारचं...अनाहुत.
त्या क्रुतहस्त शकुनीच्या पाश्यांसारखे...
गुढ...बरेच काही लपवणारे...
बरेच काही जिंकणारे..
सर्व काही जाणुन देखील...
तसाच निर्लोभी...
राजहंसीकडे कावळ्याने पाहु नये...
ह्या शब्द बाणांनी....
व्यथीत झालेला..
तोच राधेय...
तुमच्या आमच्या मनात वसलेला...
नदीकाठावर...
दैवाच्या भरोस्यावर सोडुन दिलेला...
जगण्यासाठी


ओंकार

1 comment:

  1. Superb....lavakar pustak ghein

    Swapnilmane121990.blogspot.in

    ReplyDelete