Tuesday, February 1, 2011

आज सांगू दे माझ्या व्यथा.


व्यथा काहीश्या कुस्करलेल्या...
काहीश्या वाळलेल्या..
काहीश्या गंधीत आठवांत तुझ्या..
काहीश्या...निर्जीव झालेल्या...
व्यथा...अबोल होऊन थिजलेल्या...
कोणी देतो नाव..प्रेमाचं.
कोणी देतो...नाव भक्तीचं..
कोणी जपतो...जुन्या पानांत..
कोणी फेकतो...कच-यात...
माझ्या मनाचा ठाव
कधी कुणा न लागला...
जपलेला काटा उराशी
खोल काळजात लागला...
कोणीतरी बोलले की
फुलांना भावना नसतात...
दिसत नसतील आपण आंधळ्यांना...
पण त्या नक्कीच असतात.
त्या कोमेजलेल्या प्रत्येक पाकळीत
सापडेल आजही..
तिच्या आठवांचा गंध..
जवळ ठेऊन बघ
उराशी जाणवेल..
तुझा नी माझा...
तो जन्मोजन्मीचा भावबंध

ओंकार



No comments:

Post a Comment